जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र :-
  १०,७९३.०९ चौ.कि.मी.
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण व पूर्वभागात १८.४ ते२०.५ याउत्तर अंषावर व ७८.५ ते ८०.६ टक्केया पूर्णरेखांष या भौगोलिक पट्टयात बसला आहे.

जिल्हयाची लोकसंख्य :- जिल्हयाची २००१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २०,७१,१०१ याैकी ग्रामीण लोकसंख्या १५,१३,४०२ आहे.

प्राकृतिक रचना :-
टेकडयाचा भाग, नद्याचेसखोल मैदान व डोंगराळ भाग.

भूगर्भरचना :-
प्रस्तर लाव्हांचा समावेच्च आहे.  कार्बन, ऍमाच्चिस्ट कुळसाईट, ऍसे, जैस्पर यासारखी खनिजे, खडक साधारण काळा पांढ-या चुनखडी व वाळू. जमिन काळी असून ऍल्युमिनियम, कॉबोर्नेटमॅग्नेच्चियम व काही प्रमाणात पोटॅच्चियम नग व स्फुरद यांचा समावेच्च आहे.

नद्या :- वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, इरई, अंधारी या नद्यामुळेशेतजमीन सुपीक बनली आहे.

तलाव :- जिल्हयात एकुण १६७८ माजी मालगुजारी तलाव असून मध्यम तलाव ७ आहेत.  नलेच्च्वर, चारगांव,आसोलामेंडा, लभानसराड, अमलनाला, चंदईनाला, घोडाझरी या तलावामुळे मत्स्यव्यवसाय मोठयाप्रमाणात होतो. ० ते१०० हेक्टर चे८० लघुपाटबंधारेतलाव आहेत.

वन :- जिल्हयात सर्वच तालुक्यात वनक्षेत्र विखुरलेल्या स्वरूपात आहेत.  जिल्हयातील ३,५०,२०० हेइतकेक्षेत्र वनाखालील असनूत्याचा जिल्हयाच्या एकुण भूक्षेत्राच्ची ३२.०६ इतकी टक्केवारी आहे.

हवामान व पर्जन्य  :- चंद्रपूर जिल्हयाचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. पावसाळयात दमट असते. उन्हाळयात तापमान जास्त असते. जिल्हयात पावसाचे प्रमाण जास्त असुन सिंदेवाही,ब्रम्हपुरी,नागभीड,मूल,पोंभुर्णा,सावली इत्यादी तालुक्यात पाऊस जास्त पडतो.  जिल्हयाचेसर्वसाधारण  पर्जन्यमान १३०९.५० मि.मि. आहे.

जलसिंचन :- कोल्हापूरी बंधारे ५५१ सिंचन क्षमता १९३०० हेक्टर, जवाहर विहिरी ६५३४, इतर विहिरी १९३५,तेलपंप ४७७६, विजपंप १२८७१०.
 
ग्रामीण व नागरी लोकसंखेचेप्रमाण :- जिल्हयाच्या एकुण लोकसंख्यापैकी ७३.०७ टक्के लोक ग्रामीण भागात तर २६.९३ टक्के शहरात राहतात.

अनुसुचित जाती जमाती :- २००१ च्या जनगणनेनुसार जिल्हयातील एकुण लोकसंख्येत अनुसुचित जाती प्रमाण १४.३ टक्केअसून अनुसुचित जमातीचेप्रमाण १८.१ टक्केआहे.

कामगार :- २००१ चेजनगणेनुसार जिल्हयातील एकुण कामगारांची संख्या ९,३०,७९१ आहे. काम करणा-यापैकी२५.७ शेतकरी, ३९.३ शेतमजूर , २.२ घरगुती उद्योग व ३२.९ टक्क्इतर सेवेत.

भूधारक  :- १९९०.९१ च्या कृषि गणनेच्या माहितीनुसार जिल्हयात  एकुण २,०१,५०० भूधारक  असून एकुणशेतजमीन ५२००८१ हेक्टर आहे.

पिकपध्दती :- जिल्हयातील २००४-२००५  मधील एकूण पिकाखाली असणा-या ५,३९,८०० हेक्टर क्षेत्रापैकी खरीपहंगामात तृणधान्य पिकाखाली क्षेत्र १२९७७९ हेक्टर, कडधान्य पिकाखाली २४४५५ गळीत धान्यपिकाखाली १४८३१५ हेक्टर क्षेत्र आलेआहे.

महत्वाचे उद्योग :- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य थर्मल विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्वाचे उद्योग स्थित आहेत. बाबा आमटेंचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे :- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी तपोवन (नागभीर), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर) व ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प.

 

DISCLAIMER
The website contents are provided by respective sections/dept.  from Collector Office, Chandrapur.
NIC will not be responsible for any information that may be incorrect.
Designed & Developed by National Informatics Center (NIC), Chandrapur.