इतर कायालये
माहितीचा अधिकार अधिनियम -२००५
शासकीय आश्रमशाळा
प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत शासकीय आश्रमशाळा
- शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोर्डा
- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मरेगाव
- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा देवाडा
- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मंगी
- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पाटण
- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जिवती
- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा देवई
- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा रुपापेठ
वसतिगृहे
प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत आदिवासी मुलांचे/मुलींचे शासकीय वसतिगृहे
अ.क्र. | वसतीगृहांची नावे |
1 | शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्रमांक १ चंद्रपूर |
2 | शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्रमांक २ चंद्रपूर |
3 | शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह गडचंदूर |
4 | शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह सिंदेवाही |
5 | शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह कोरपणा |
6 | शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह गोंडपीपरी |
7 | शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह मूल |
8 | शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्रमांक १ राजुरा |
9 | शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्रमांक. २ राजुरा |
10 | सरकारी आदिवासी मुलांचे वसतिगृह पोंभुर्णा |
11 | सरकारी आदिवासी मुलांचे वसतिगृह जिवती |
12 | सरकारी आदिवासी मुलांचे वसतिगृह सावली |
13 | सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह क्रमांक १ चंद्रपूर |
14 | सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह क्रमांक २ चंद्रपूर |
15 | सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह गडचंदूर |
16 | सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह गोंडपीपरी |
17 | सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह सिंदेवाही |
18 | सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह राजुरा |
19 | सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह मुल |
20 | सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह जिवती |
21 | सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह कोरपणा |
22 | सरकारी आदिवासी मुलींचे वसतिगृह सावली |
23 | शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह पोंभुर्णा |
योजना
योजनेचे नाव |
लाभाचा तपशिल |
योजनेचे निकष |
एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कुल | आदिवासी विद्यार्थ्यांना निवासासह CBSE पॅटर्नची शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना पुरविण्यात येते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, नाश्ता, भोजन, शालेय गणवेष, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, शुज, मोजे, ब्लँकेट, स्वेटर इत्यादी साहित्य पुरविण्यात येते. CET, JEE, NEET यां सारख्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात येते.
|
1) इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत असावा
2) आधार कार्ड 3) जन्म दाखला 4) शाळा सोडल्याचा दाखला 5) जातीचा दाखला 6) पालक दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला किंवा उत्पन्न रु. 8 लक्ष पेक्षा जास्त नसावे |
शासकिय आश्रम शाळा समुह योजना | महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व अति दुर्गम भागात राहणाऱ्या अनु. जमातीची सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी 1972-73 पासून क्षेत्रविकासाचा दृष्टीकोण स्वीकारुन शासकीय आश्रम शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सदर आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना वर्ग 1 ते 12 पर्यंत शिक्षण, भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, उच्च प्रतिचे भविष्य वेध शिक्षण इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात.
|
1) जन्म दाखला
2) शाळा सोडण्याचा दाखला 3) गुणपत्रक 4) दारिद्रय रेषेखालील दाखला 5) जातीचा दाखला 6) पालकाचा उत्पन्न दाखला 7) कुटुंबाचे हमीपत्र |
अनुदानित आश्रम शाळा समुह योजना |
महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व अति दुर्गम भागात राहणाऱ्या अनु. जमातीची सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी 1972-73 पासून क्षेत्रविकासाचा दृष्टीकोण स्वीकारुन अनुदानित आश्रम शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सदर आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना वर्ग 1 ते 12 पर्यंत शिक्षण, भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, उच्च प्रतिचे भविष्य वेध शिक्षण इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात. |
1) जन्म दाखला
2) शाळा सोडण्याचा दाखला 3) गुणपत्रक 4) दारिद्रय रेषेखालील दाखला 5) जातीचा दाखला 6) पालकाचा उत्पन्न दाखला 7) कुटुंबाचे हमीपत्र |
नामांकीत शाळा समुह | आदिवासी विकास विभागाने राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट स्कुल प्रवेशाची योजनाा सुरु केली आहे. या शाळांचे उद्दिष्ट आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि निवासी सुविधा प्रदान करणे आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात 6 नामांकीत निवासीशाळा कार्यरत आहेत, ज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश दिला जातो.
|
1) आधार कार्ड
2) जन्म दाखला 3) शाळा सोडल्याचा दाखला 4) जातीचा दाखला 5) पालक दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला किंवा उत्पन्न रु. 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे |
आदिवासी मुला- मुलींचे शासकीय वसतीगृह | अनुसुचित जमातीच्या मुला – मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी या उद्देशाने सदर योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर वसतीगृहामध्ये निवास व्यवस्था, नाश्ता, भोजन विविध स्पर्धा परीक्षांकरीता पुस्तके, शारीरीक विकासाकरीता क्रिडा साहित्य, शैक्षणिक भत्ता इत्यादी उपलब्ध करुन दिले जाते. जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या वसतीगृहामध्ये मुलांना भोजन व इत्तर शैक्षणिक साहित्याकरीता डिबीटी द्वारे रक्कम अदा करण्यात येते.
|
1. शाळा सोडण्याचा दाखला
2. गुणपत्रक 3. दारिद्रय रेषेखालील दाखला 4. जातीचा दाखला 5.पालकाचा उत्पन्न दाखला 6. कुटुंबाचे हमीपत्र |
भारत सरकार शिष्यवृत्ती | आदिवासी विद्यार्थ्यांना शालांत परिक्षेत्तर उच्च शिक्षणाकरीता प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने व त्यांना उच्च शिक्षणाचा खर्च भागविता यावा म्हणुन भारत सरकार द्वारा हि योजना राबविली जाते. सदर शिष्यवृत्ती हि आदिवासी विद्यार्थ्यांना महाविद्यालया मार्फत देण्यात येते.
|
1. कनिष्ठ विद्यालय / महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेले असावे.
2. अनुसुचित जमातीचा असावा 3. रहिवासी दाखला असावा 4. जात वैधता प्रमाणपत्र / जात प्रमाणपत्र 5. पालक दारिद्रय रेषेखालील किंवा उत्पन्न रु.2.50 लक्ष पेक्षा कमी असावा 6. राष्ट्रीयकृत बॅकेमध्ये विद्यार्थ्यांचे खाते असावे. |
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती | अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी व त्यांचा दर्जा उच्च व्हावा व त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या करीता भारत सरकार द्वारे परदेशात शिक्षण घेण्याकरीता शिष्यवृत्ती दिली जाते.
|
1. विद्यार्थी हा परदेशात उच्च शिक्षण घेत असावा.
2. विद्यार्थी ज्या विद्यापीठात शिक्षण घेत आहे ते विद्यापीठ (QS) वर्ल्ड रँकींग मध्ये 200 क्र. च्या आत असावे. 3. जातीचा दाखला 4. रहिवासी दाखला 5. अधिवास प्रमाणपत्र 6. पालक दारिद्रय रेषेखालील किंवा उत्पन्न रु.8.00 लक्ष पेक्षा कमी असावा 7. बॅकेमध्ये विद्यार्थ्यांचे खाते असावे 8. मागील वर्षाचे गुणपत्रिका 9. आधार कार्ड 10. जात वैधता प्रमाणपत्र |
सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजना | इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती जिल्हा परिषद (गटशिक्षण अधिकारी) यांचे व्दारे अदा केली जाते.
|
1. अनुसुचित जमातीचा असावा
2. रहिवासी दाखला असावा 3. जात प्रमाणपत्र 4. पालक दारिद्रय रेषेखालील किंवा उत्पन्न रु.1.08 लक्ष पेक्षा कमी असावा 5. राष्ट्रीयकृत बॅकेमध्ये विद्यार्थ्यांचे / पालकांचे खाते असावे. |
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना | सिमेंट रस्ते, सिमेंट नाली, जोडरस्ते, सार्वजनिक हौद, बोअरवेल, सबमर्सिबल पंप, जुन्या विहिरींची दुरस्ती, नाल्या-मो-या बांधणे, वस्तीचे विद्युतीकरण, मार्ग दिप बसविणे, समाजमंदीर, वाचनालय, सार्वजनिक शौचालय, स्मशानभुमी बांधकाम, नदीकाठ संरक्षण भिंत, घाट ई. तिर्थक्षेत्र पर्यटन विकास, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी कामे लोकसंखेच्या वित्तिय मर्यादेनुसारघेण्यात येतात.
|
आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक 03 फेब्रुवारी 2023 अन्वये ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेचे मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थीक मर्यादा निश्चीत करण्यात आली आहे. सदर वित्तीय मर्यादेत 5 वर्षांपर्यंत संबंधीत वस्ती/ वाडे/ पाडे/ समुहामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक कामे घेता येतील. ज्या ठिकाणी अद्याप पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत अशा वस्ती/ वाडे/ पाडे/ समुहा अशा ठिाकाणांचा प्राधान्याने विचार करण्यात येतो. |
स्वाभीमान सबळीकरण योजना | दारिद्रय रेषेखालील भुमीहिन कुटुंबांना उदर निर्वाहाचे साधन नसल्यामळे रोजगार हमी योजना किंवा खाजगी व्यक्ती कडे मजुरी करावी लागते व रोजगाराच्या निमित्याने त्यांचे परराज्यात स्थलांतर होते. हे टाळण्यासाठी आदिवासी भुमिहिन कुटुंबास 2 एकर बागायती किंवा 4 एकर जिरायती जमिन देण्यात येते.
|
1) या योजनेअंतर्गत शासनाकडून जमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जमातीच्या आदिवासी कुटुंबांच्या पती-पत्नीच्या नावाने केली जाईल. मात्र विधवा व परित्यक्ता स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावानेच केली जाईल.
2) ही योजना शंभर टक्के शासन अनुदानित आहे. 3) अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन आदिवासी कुटुंबाला 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन उपलब्ध करून देण्यात येईल. 4) या योजनेकरिता अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय 60 वर्षे इतके असावे. 5) या योजनेअंतर्गत निवडण्यात येणारा लाभार्थी हा दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन आदिवासी असावा. 6) या योजनेकरिता निवडावयाच्या लाभार्थ्यांमध्ये खालील घटकांना प्राधान्य देण्यात येईल. अ) भूमिहीन आदिवासी परित्यक्ता स्त्रिया. ब) भूमिहीन आदिवासी विधवा स्त्रिया. क) भूमिहीन कुमारी माता. ड) भूमिहीन आदिम जमाती. इ) भूमिहीन पारधी. 7) शासनाने ज्यांना गायरान, सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे तसेच वैयक्तिक वन हक्क प्राप्त झालेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. |
कन्यादान योजना | लग्न समारंभाच्या निमित्याने मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि विवाह सोहळयातील अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी सामुहिक विवाह सोहळयांना प्रति जोडपे रु. 25,000/- अनुदान देऊन प्रोत्साहन देण्यात येते.
|
1) जातीचा दाखला
2) बाल विवाह प्रतिबंध दाखला 3) आधार कार्ड 4) बँक खाते पासबुक 5) दोन पासपोर्ट फोटो |
शबरी आवास योजना | ग्रामिण भागासाठी रु. 1.32 लक्ष
शहरी भागासाठी रु. 2.50 लक्ष |
1) लाभार्थी अनुसूचित जमातीचा असवा
2) उत्पन्न दाखला ग्रामीण भागासाठी रु. 1.20 लक्ष व शहरी भागासाठी रु. 3.00 लक्षाच्या मर्यादेत 3) अर्जदाराच्या नावे गाव नमुना 8 असणे आवश्यक 4) लाभार्थ्याचे कच्चे/ कुडाचे/ मातीचे किंवा झोपडीचे घर असावे. 5) अपंग/ विधवा/ परित्यक्त्या/ भुमिहीन/ अल्प भुधारक असल्यास प्राधान्य. 6) अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (लाभार्थ्यांचे) 7) यापूर्वी लाभार्थ्याने अन्य कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या नवासा. |
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींना विविध व्यवसाय करण्याकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे. | ग्रामिण / शहरी भागासाठी रु.50000/-
|
1) जातीचा दाखला लाभार्थ्यांचा नावाचा
2) उत्पन्न दाखला/BPL दाखला लाभार्थ्यांचे नावे 3) ग्रामसभेचा ठराव 4) आधारकार्ड ची झेरॉक्स 5) बॅक पासबुक ची झेरॉक्स 6) राशन कार्ड |
केंद्रावर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या महिलांना टु इन वन शिवन यंत्र घेण्याकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे. | ग्रामिण / शहरी भागासाठी रु.10000/-
|
1) जातीचा दाखला लाभार्थ्यांचा नावाचा
2) उत्पन्न दाखला/BPL दाखला लाभार्थ्यांचे नावे 3) ग्रामसभेचा ठराव 4) शिवणयंत्र प्रमाणपत्र 5) आधारकार्ड ची झेरॉक्स 6) बॅक पासबुक ची झेरॉक्स |
केंद्रावर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना मासोळी पकडण्याकरीता जाळी व इतर साहित्य खरेदी करण्याकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे. | ग्रामिण / शहरी भागासाठी रु.50000/-
|
1) जातीचा दाखला लाभार्थ्यांचा नावाचा
2) उत्पन्न दाखला/BPL दाखला लाभार्थ्यांचे नावे 3) ग्रामसभेचा ठराव 4) रेशन कार्ड 5) आधारकार्ड ची झेरॉक्स 6) बॅक पासबुक ची झेरॉक्स |
केंद्रावर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासुन पिकांचे संरक्षक करण्याकरीता काटेरी तार / जाळी सौर उर्जेवरील तारेचे कंपाऊंड करण्याकरीता 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे. | ग्रामिण / शहरी भागासाठी रु.50000/-
|
1) जातीचा दाखला लाभार्थ्यांचा नावाचा
2) उत्पन्न दाखला/BPL दाखला लाभार्थ्यांचे नावे 3) ग्रामसभेचा ठराव 4) 7/12 व गांव नमुना – 8 अ 5) आधारकार्ड ची झेरॉक्स 6) बॅक पासबुक ची झेरॉक्स 7) रेशन कार्ड |
केंद्रावर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना ताडपत्री घेण्याकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे. | ग्रामिण / शहरी भागासाठी रु.20000/-
|
1) जातीचा दाखला लाभार्थ्यांचा नावाचा
2) उत्पन्न दाखला/BPL दाखला लाभार्थ्यांचे नावे 3) ग्रामसभेचा ठराव 4) 7/12 व गांव नमुना – 8 अ 5) आधारकार्ड ची झेरॉक्स 6) बॅक पासबुक ची झेरॉक्स 7) रेशन कार्ड |
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना काटेरी तार व जाळीचे तार घेण्याकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे. (सिमेंट पोल व इतर अनुषंगीक खर्चासह) | ग्रामिण / शहरी भागासाठी रु. 50,000/-
|
1) जातीचा दाखला लाभार्थ्यांचा नावाचा
2) उत्पन्न दाखला/BPL दाखला लाभार्थ्यांचे नावे 3) ग्रामसभेचा ठराव 4) 7/12 व गांव नमुना – 8 अ 5) आधारकार्ड ची झेरॉक्स 6) बॅक पासबुक ची झेरॉक्स 7) रेशन कार्ड |
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत आदिवासी बचत गट / आदिवासी स्वयंरोजगार संस्था यांना स्वयंरोजगाराकरीता बिछायत / साऊंड व लाईटिंग / मंडप डेकोरेशन करीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे | ग्रामिण / शहरी भागासाठी रु. 2,50,000/-
|
1) जातीचा दाखला (गटातील सर्व सदस्याच्या नावाचा)
2) गटाचे नोंदणी प्रमाणपत्र 3) ग्रामसभेचा ठराव 4) गटातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड ची झेरॉक्स 5) गटाचे नावे बॅक पासबुक ची झेरॉक्स 6) गटातील सर्व सदस्यांचे रहिवासी दाखला 7) गटातील सदस्यांचा गृप फोटो |
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत आदिवासी शेतकरी गटांना थ्रेशर मशिन खरेदी करण्याकरीता अर्थसहाय्य देणे | ग्रामिण / शहरी भागासाठी रु. 4,00,000/-
|
1) जातीचा दाखला गटातील सर्व सदस्याच्या नावाचा
2) गटाचे नोंदणी प्रमाणपत्र 3) ग्रामसभेचा ठराव 4) गटातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड ची झेरॉक्स 5) गटाचे नावे बॅक पासबुक ची झेरॉक्स 6) गटातील सर्व सदस्यांचे रहिवासी दाखला 7) गटातील सदस्यांचा गृप फोटो |
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना मिनी आटा चक्की / हळद मसाले कांडप यंत्र खरेदी करण्याकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे. | ग्रामिण / शहरी भागासाठी रु.50,000/-
|
1) जातीचा दाखला लाभार्थ्यांचा नावाचा
2) उत्पन्न दाखला/BPL दाखला लाभार्थ्यांचे नावे 3) ग्रामसभेचा ठराव 4) आधारकार्ड ची झेरॉक्स 5) बॅक पासबुक ची झेरॉक्स 6) रेशन कार्ड |
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या पुरुष बचत गटांना / शेतकरी समुहांना ट्रॅक्टर व ट्राली खरेदी करण्याकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य देणे. | ग्रामिण / शहरी भागासाठी रु. 7,50,000/-
|
1) जातीचा दाखला गटातील सर्व सदस्याच्या नावाचा
2) गटाचे नोंदणी प्रमाणपत्र 3) वाहन परवाना गटाच्या नावे 4) ग्रामसभेचा ठराव 5) गटातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड ची झेरॉक्स 6) गटाचे नावे बॅक पासबुक ची झेरॉक्स 7) गटातील सर्व सदस्यांचे रहिवासी दाखला 8) गटातील सदस्यांचा गृप फोटो |
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत अनुसुचित जमातीच्या बचत गटांना / समुहांना सिमेंट विटा बनविण्याची मशिन व इतर अनुषंगीक साहित्य खरेदी करण्याकरीता 85 व 100 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य करणे | ग्रामिण / शहरी भागासाठी रु. 4,65,000/-
|
1) जातीचा दाखला गटातील सर्व सदस्याच्या नावाचा
2) गटाचे नोंदणी प्रमाणपत्र 3) ग्रामसभेचा ठराव 4) गटातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड ची झेरॉक्स 5) गटाचे नावे बॅक पासबुक ची झेरॉक्स 6) गटातील सर्व सदस्यांचे रहिवासी दाखला 7) गटातील सदस्यांचा गृप फोटो |
शासकीय आश्रमशाळांची माहिती
- 2022-2023 FREE SHIP STUDENT DETAILS
- 2022-2023 POST MATRIC STUDENT DETAILS
- 2023-2024 FREESHIP STUDENT DETAILS
- 2023-2024 POST MATRIC STUDENT DETAILS
- अनुदानित आश्रम शाळा माहिती पटसंख्या 2024-25
- अनुदानित आश्रम शाळा माहिती
- अनुदानित आश्रम शाळा मुख्याध्यापक माहिती
- शासकीय आदिवासी मुलामुलींचे वसतीगृहांची यादी
- शासकीय आश्रमशाळांची माहिती
- शासकीय आश्रमशाळेची पटसंख्या
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय,चंद्रपुर
पत्ता:- जुना कलेक्टर बंगाला, साईबाबा वार्ड, पानी टंक्की जवळ, आकाशवाणीचा मागे,चंद्रपुर पिन- 442401
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे नाव- दिपक व्ही .बानाईत मो.क्र.-9766348987

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,चंद्रपुर अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार खालील प्रमाणे अधिसुचित सेवा असुन चंद्रपुर जिल्हाचे नागरीकांना खालील प्रमाणे सेवा देण्यात येत आहे.
अधिसुचित सेवा क्र.307 नौकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह
चंद्रपुर सारख्या नक्षलाईट व मागासलेल्या क्षेत्रात नौकरी करणाऱ्या बाहेर गावातुन आलेल्या महिला व मुलींना धर्मनिरपेक्ष उद्देश्याने तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन जिल्हयात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,चंद्रपुर अंतर्गत सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालीत जिजामाता वर्कींग वुमन होस्टेल,चंदपुर सुरु आहे. जिजामाता वर्कींग वुमन होस्टेल,चंदपुर ला संद 1982-83 मध्ये होस्टेल सुरु करण्याची परवागी समाज कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वार देण्यात आली. सन 1984-87 मध्ये इमरतीचे बांधकाम पुर्ण करुन वसतीगृहात कामकाजी माहिलांना प्रवेश देण्यात येत आहे. वसतीगृहाचे मंजुर प्रवेश क्षमता 30 आहे. संस्थे मध्ये कामकाजी महिलांना प्रवेश देण्यात येतो. त्या प्रमाणे संगणक प्रशिक्षण, नर्सिंग प्रशिक्षण, शिवण शाळा प्रशिक्षण, मॉन्टेसरी प्रशिक्षण करणाऱ्या महिलांना सुध्दा प्रवेश देण्यात येते.
संस्थेने आता पर्यंत 750 पेक्षा जास्त नौकरी करणाऱ्या महिलांना व प्रशिक्षणार्थीना लाभ दिला आहे.अश्या प्रकारे मागील 38 वर्षा पासुन सुरु आहे.
उपलब्ध सुविधा:-
- शहरच्या मध्यभागी सुसज्ज इमारत
- 24 तास पाणी व विज उपलब्ध
- स्वयंपाक घर व भोजन कक्ष
- सुसज्ज प्रकाशित व हवेशिर खोली
- टीव्ही,सोलर वाटर हिटर
- गेस्ट रुम, मेडीकल रुम,गर्ल्स कॉमन रुम
- योगा व मेडीटेशन हॉल
- प्रत्येक खोलीत गादी, परंग,टेबल,खुर्ची, पंखा, लाईट व आलमारी
- फयर फयटिंग सिस्टम
- सीसी टिव्ही कॅमेरेची सुविधा
संपर्क :- जिजामाता वर्कींग वुमन होस्टेल, शास्त्री नगर, चंद्रपुर मोबाईल क्रमांक. 8698177262/9373488064
अधिसुचित सेवा क्र.308 बालगृह/निरीक्षणगृह येथे बालकांना दाखल करुन घेणे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 41 नुसार बालगृह व निरीक्षणगृह नोंदणी होतात. या कलमा खाली काळजी व संरक्षण साठी खुले निवारागृह,विषेश दत्तक संस्था तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांन करीता सुरक्षित ठिकाण नोंदणी होतात.
बालगृहात मा.बाल कल्याण समिती यांचे आदेशान्वये हरविलेले मुले,सापडलेले मुले,सोडुन दिलेले मुले, अनाथ ,परित्यागित मुले,रस्त्यावर राहणारे मुले,बाल कामगार,बाल भिक्षेकरी,धाक्यात असलेले मुले,बाल विवाह पिडीत मुले,असक्ष पालकांचे मुलांना दाखल केले जाते.दाखल असलेल्या बालकांना अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण,प्रशिक्षण, समुपदेशन व पुनर्वसन केला जाते.
निरीक्षणगृह येथे मा.बाल न्याय मंडळ यांचे आदेशान्वये चौकशी होई पर्यंत विधीसंघर्षग्रस्त बालकांना निरीक्षणगृहात दाखल केला जाते. दाखल केलेले बालकांना समुपदेशन, शिक्षण ,प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यात येते.
चंद्रपुर जिल्हयात शासकिय मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह सन 1985 पासुन सुरु आहे.
पत्ता :- डॉ.अल्लुरवार यांचे ईमारत,सी-18,शास्त्रीनगर, शास्त्रीनगर गृह निर्माण सोसाईटी जवळ, मुल रोड,चंद्रपुर. पिन-442402
चंद्रपुर जिल्हयात शासकिय मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह सुरु असुन सन 2024 पासुन सुरु आहे.
पत्ता :- जिल्हा स्टेडीयम जवळ, साईबाबा वार्ड, चंद्रपुर पिन- 442401
अधिसुचित सेवा क्र.309 शक्ती सदन महिला निवासगृह/ पिडीत महिलांचे स्वाधारगृह
केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग,नवी दिल्ली द्वारा मान्यताप्राप्त अल्पमुदती महिला निवासगृह(क्षमता 30 लाभार्थी) सन 1996 पासुन आणि स्वाधार निवासगृह (क्षमता 100 लाभार्थी) सन 2005 पासुन कार्यन्वीत होते. सदर दोन्ही योजना सन 2018-19 मध्ये स्वाधारगृह योजना विलीन करण्यात आली. सन 2022-23 मध्ये स्वाधार योजना मिशन शक्ती अंतर्गत शक्ती सदन मध्ये विलीन करण्यात आली. चंद्रपुर जिल्ह्यात सरस्वती शिक्षण महिला मंडळ,चंद्रपुर द्वारे शक्ती सदन सुरु आहे. सदर संस्थाद्वारे आज शक्ती सदर हि योजना (क्षमता 50 लाभार्थी) कार्यन्वीत आहे. या निवासगृहामध्ये संकटात सापडलेल्या, परितक्त्या,विधवा,कारावास भोगलेल्या, कुमारी माता, नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या,वेश्या व्यवसाध सोडणाऱ्या, हिंसाचारास वेळी पडलेल्या, समाजाने बहिष्कृत केलेल्या,लौगिक अत्याचार ग्रस्त,एच.आय.व्ही ए्डस ग्रस्त महिला व मुली इत्यादींना आश्रय देवुन शिक्षण,प्रशिक्षण,समुपदेशन,कुटुंबात व समाजात समायोजन इत्यादी कार्य नियोजनबध्द पध्दतीने करण्याचे काम सुरु आहे.पोलिसांना भटकत असतांना सापडलेल्या महिला व मुली,वेश्या व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर त्या व्यवसायातुन परावृत्त करण्याच्या उद्देशाने त्यांना समुपदेशन व मदत करण्याकरीता निवासगृहात मा.न्यायालयाच्या आदेशान्वये व पोलिसाच्या मध्यममाने दाखल करण्यात येते.
प्रवेश प्रक्रिया
निवासगृह कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अन्वये आश्रय गृह सेवा देणारी संस्था जाहिर केल्यामुळे व मा.न्यायानयाच्या आदेशान्वये, जिल्हा वैद्यकिय महाविद्यालय, पोलिस विभाग,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्याल, रेल्वे पोलिस, रेल्वे चाईल्ड लाईन, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, समाजिक संस्था, संरक्षण अधिकारी तसेच समाजिक कार्यकर्ते व इतर शासकीय व अशासकीय विभाग यांच्याद्वारे किंवा समस्याग्रस्त महिला स्वत: निवासगृहात प्रवेश धेवु शकते. 24 तास विासगृह प्रवेशितांकरीता कार्यरत असते. निवासगृहात प्रवेशितांना समस्येनुसार समुपदेशन,आरोग्य तपासणी, व्यवसायीक प्रशिक्षण व कुटुंबात समायोजनाकरीता कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन तसेच वेळ प्रसंगी वैद्यकिय सुविधा,विधी सेवा व पोलिस मदत देण्यात येत असेते.
नवासगृहतील पिडीत लाभार्थींना मा.सचिव, जिल्हाविधीसेवा प्राधिकरण,चंद्रपुर यांचे मार्गर्शनानुसार न्यायालयात खटला दाखल करण्या संदर्भात मोफत विधी सेवा उपलब्ध करुन देण्यात येते.
प्रवेश,पुनर्वसन व उपस्थिती :-
सन 1996 पासुन आज पर्यंत एकुण प्रवेशीत 3000चे वर लाभार्थींना प्रवेश घेतला असुन अंदाचे 2000 चे वर लाभार्थीचे पुरर्वसन करण्यात आले आहे. आज पर्यंत पोलिसां मार्फत 1600 च्यावर महिलांना निवासगृहात आश्रय देण्यात आलेला असुन या पैकी 100च्या वर अनैतिक व्यापारअंतर्गत आलेल्या लाभार्थी आहेत.
प्रशिक्षण
संस्थेत दाखल महिलांना शिवणकाम,टंकलेखन,संगणक,ब्युटी पार्लर, हस्तकला, अंबर चरखा इत्यादी प्रशिक्षण निवासी लाभार्थींना देण्यात येत असते. आज पर्यंत एकुण 1800 चे वर प्रशिक्षण देण्यात असले असुन 500 चे वर निवासी लाभार्थींना खाजगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
विवाह
सन 1996 पासुन आजपर्यंत कुमारी माता, प्रेमप्रकरण समस्या व विधवा लाभार्थींचे पुनर्वसनाच्या माध्यमाने 119 विवाह करुन देण्यात आलेले आहेत.
पत्ता:- स्वाधार महिला निवासगृहए कृष्णानगर चौक, मुल रोड,चंद्रपुर मोबाईल क्रमांक-9765932527