विषय:- शासकीय जमीन विविध प्रयोजनाकरिता मंजूर करण्याबाबतच्या कामकाजाची आदर्श कार्यपध्दती. (Grant of Land Procedure)
अ.क्र. | तपशिल/बाब |
स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
1 | शासकीय जमीन महसूल मुक्त देण्याची जिल्हाधिकारी यांची शक्ती (नियम 6(1)) | महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, 1971 चे नियम 6 (1) अन्वये, शासकीय जागा (एक) शाळा किंवा महाविद्यालय (दोन) रुग्णालये (तीन) दवाखाणे आणि (चार) इतर सार्वजनिक बांधकामे यांच्या बांधकामासाठी मंजूर करण्याबाबत शासन निर्णय क्र.विअप्र-2019/प्र.क्र.20/2019/विनियम दिनांक 08.08.2019 अन्वये जिल्हाधिकारी यांना खालीलप्रमाणे वित्तीय अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे.
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
2 | शासकीय जमीन महसूल मुक्त व सारामाफीने किंवा शासनाने अन्यथा विवक्षितपणे विनिर्दिष्ट केलेले असल्यास त्यानुसार जमीन मंजूरीची जिल्हाधिकारी यांची शक्ती (नियम 6(3)(ब)) | Ø महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, 1971 चे नियम 6(3)(ब) मध्ये, “ज्या ठिकाणी राज्य शासनाने रितसर मान्यता प्रदान केलेल्या प्रकल्पांकरिता शासकीय जमीन आवश्यक असेल, तेथे अशा जमिनीचे भोगवटामूल्य कितीही असले तरी, जिल्हाधिकारी अशी जमीन राज्य शासनाच्या संबंधित विभागास महसूलमुक्त व सारामाफीने किंवा शासनाने अन्यथा विवक्षितपणे विनिर्दिष्ट केलेले असल्यास त्यानुसार प्रदान करण्यास सक्षम राहतील,” अशी तरतूद केली आहे.
Ø सदर तरतूदीनुसार, राज्य शासनाने रितसर मान्यता प्रदान केलेल्या प्रकल्पांकरिता शासकीय जमीन आवश्यक असेल, तेथे अशा जमिनीचे भोगवटामूल्य कितीही असले तरी जिल्हाधिकारी यांना अशी शासकीय जमीन सार्वजनिक प्रयोजनाकरिता महसूलमुक्त व सारामाफीने किंवा शासनाने अन्यथा विवक्षितपणे विनिर्दिष्ट केलेले असल्यास त्यानुसार मंजूर करता येते.
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
3 | केंद्र शासनाने रितसर मान्यता प्रदान केलेल्या प्रकल्पाकरिता शासकीय जमीन मंजूर करणे
(नियम 6(3)(क)) |
Ø महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, 1971 चे नियम 6(3)(क) मध्ये, “ज्या ठिकाणी केंद्र शासनाने रितसर मान्यता प्रदान केलेल्या प्रकल्पांकरिता शासकीय जमीन आवश्यक असेल व अशा जमिनीची मागणी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाली असेल, तेथे अशा जमिनीचे भोगवटामूल्य कितीही असले तरी, राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे निश्चित करेल एवढे संबंधित जागेचे भोगवटामुल्य वसूल करणेच्या अधीन राहून जिल्हाधिकारी अशी जमीन केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयास प्रदान करण्यास सक्षम राहतील,” अशी तरतूद केली आहे.
Ø यानुसार, केंद्र शासनाने रितसर मान्यता प्रदान केलेल्या प्रकल्पांकरिता शासकीय जमीन आवश्यक असेल, तेथे संबंधित जागेचे भोगवटामुल्य (चालु वर्षाचे बाजारभावानुसार) वसूल करणेच्या अधीन राहून जिल्हाधिकारी यांना अशी जमीन केंद्र शासनाच्या संबंधित मंत्रालयास प्रदान करता येते. |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
4 | महसूल मुक्त जमीन देण्याची राज्य शासनाची शक्ती
(नियम 5(1) |
Ø नियम 5(1) मध्ये, “नियम, 6, 7 आणि 8 मध्ये उपबंधीत केलेले असेल त्याखेरीज, राज्य शासनाच्या मंजूरीशिवाय भोगाधिकार मूल्यरहित किंवा जमीन महसूल मुक्त किंवा दोन्हीपासून मुक्त अशी कोणतीही जमीन देता येणार नाही.” अशी तरतूद केलेली आहे.
Ø यानुसार, एखाद्या प्रकल्पाला प्रशासकीय मंजूरी नसेल व प्रस्तावित शासकीय जमिनीचे चालु बाजारभावानुसार मुल्य हे रु. 50.00 लक्षपेक्षा अधिकचे असेल, त्यावेळी नियम 5(1) अन्वये प्रस्ताव मंजूरीकरिता शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
5 | Grant of Land to local bodies government undertaking and corporate bodies – policy regarding (शासन परिपत्रक दि. 04.02.1983) | Ø महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक दि. 04.02.1983 मध्ये खालीलप्रमाणे तरतुद केलेली आहे-
II) (i) All Government lands in municipal limits earmarked in the development plan for parks, play grounds, dispensaries, Schools and Public conveniences shall be given free of occupancy price and free of revenue in accordance with Rules 5 & 6 of the Maharashtra land revenue (Disposal of Government Land) Rules.
(ii) Government lands in Municipal limits in conformity with the Development Plan for public purposes other than the purposes mentioned in S.No. (i) above, market price prevalent on the date of publication of the draft Development plan shall be charged irrespective of whether the lands are intended to be put to remunerative use or otherwise.
(iii) In other cases Government lands shall be granted at current market value.
Ø यानुसार, जमीन मागणीच्या प्राप्त प्रस्तावातील प्रयोजन हे वरीलप्रमाणे 3 मुद्यांपैकी कोणत्या विषयात मोडते, यावरून जमीन मंजूरीची कार्यवाही करण्यात येते. |
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
6 | परिपूर्ण मुळ प्रस्ताव सादर करणेबाबत. | शासकीय जमीन सार्वजनिक प्रयोजनाकरिता मंजूर करण्याबाबतचा मुळ प्रस्ताव तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांचे कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
7 | शासकीय जमीन मंजूरीच्या प्रस्तावामध्ये आवश्यक कागदपत्रे |
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
8 | अर्ज कोठे सादर करावा? | Ø सार्वजनिक प्रयोजनाकरिता जमीन मागणीचा अर्ज संबंधित तहसीलदार यांचे कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह सादर करावा. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
शासकीय जमीन मागणीच्या प्रस्तावावरील कार्यवाही
जिल्हाधिकारी कार्यालयातील Work Flow |
Ø अर्जदार विभागाकडून जागा मागणीचा अर्ज प्राप्त झालेनंतर तहसीलदार यांचे स्तरावरुन प्रकरण सुरु करण्यात येऊन संबंधित विभागाचे अभिप्राय मागविण्यात येईल.
Ø प्रकरणात जाहिरनामा काढून आक्षेप/हरकती घेऊन प्रकरण/प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्राप्त होईल. Ø अर्जदार विभाग यांचे अर्जाचे अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत प्राप्त प्रकरण/ प्रस्तावातील कागदपत्राची महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांच्याकडून पडताळणी करण्यात येऊन प्राथमिक तपासणीमध्ये प्रकरण योग्य आढळून आल्यास या कार्यालयाचे ई-ऑफीस प्रणालीमध्ये सदर प्रकरण पंजीबध्द करुन सदरहु प्रस्तावावर जमीन मंजूरीबाबत/शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल. Ø शासकीय जमीन मंजूरीच्या प्रकरणात खालीलप्रमाणे कार्यवाहीचा Work Flow असेल,
Ø प्रस्ताव मंजूरीनंतर जमीन मंजूरीचा आदेश पारित करून सदरहु आदेशानुसार कार्यवाही करणेस/फेरफार घेणेस/मंजूर जमिनीचा ताबा आवेदक विभागास देणेस संबंधित तहसिलदार यांना निर्देशीत करण्यात येईल. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
9 |
आवश्यक शुल्क
शुल्क भरण्याची पध्दत
|
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
10 |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, शासन परिपत्रक
|
शासकीय जमीन विविध सार्वजनिक प्रयोजनाकरिता मंजूर करण्यासंबंधाने वापरण्यात येणारे खालीलप्रमाणे संबंधित शासन अध्यादेश, अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रक वाचणेकरिता कृपया खालील लिंकवर क्लिक करावे.
|
||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
11 | शासकीय जमीन विविध सार्वजनिक प्रयोजनाकरिता वाटप करताना जमीन मंजूर आदेशातील आवश्यक अटी व शर्ती | v अटी व शर्ती
1. मंजूर करण्यात आलेली जमीन प्रतिग्रहिता हे भोगवटदार वर्ग–2 म्हणून धारण करतील. 2. मंजूर जमिनीची नोंद भोगवटदाराचे रकान्यात न घेता इतर अधिकारात घेण्यात यावी. 3. मंजूर जमिनीचा ताबा मिळाल्यापासून 3 (तीन) वर्षांच्या आंत प्रतिग्रहीता जमिनीवर भरीव व कायमस्वरूपी इमारत उभारील (बांधकाम करील). यात कसूर झाली तर, प्रतिग्रहीताकडून ती जमीन परत घेतली जाण्यास पात्र असेल. 4. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय सदर जमीन किंवा तिचा कोणताही भाग किंवा तिच्यातील कोणतेही हितसंबंध विक्री/देणगी देऊन/अदला बदल करून/पट्टयाने देऊन खाजगी-सार्वजनिक सहभाग तत्वावर किंवा बाह्य यंत्रणाद्वारे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करता येणार नाही. 5. सदर जमिनीवर अथवा त्याच्या कोणत्याही भागावर अन्य व्यक्ती/संस्था/कंपनी इत्यादीचे कोणत्याही प्रकारचे हक्क निर्माण होतील अशा प्रकारे कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. तसेच शासनाच्या महसूल विभागाच्या पूर्वमान्यतेशिवाय सदर जमिनीचे पोटविभाजन करता येणार नाही. 6. मंजूर जमिनीचा वापर मंजूर प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी करता येणार नाही. अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी जमिनीचा अथवा त्याच्या कोणत्याही भागाचा कायमस्वरूपी अथवा तात्पूरता देखील वापर करण्यापूर्वी शासनाची, महसूल विभागाची पूर्वमान्यता आवश्यक राहील. 7. प्रस्तावित प्रयोजनामुळे लगतच्या खातेदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्यांच्या वैध वहीवाटीस बाधा येणार नाही तसेच सदर जागेस पोचरस्ता उपलब्ध असल्याची खात्री करावी. 8. जमिनीचे संरक्षण, देखभाल करण्याची जबाबदारी आवेदक विभागाची राहील. 9. तहसिलदार यांचे नमुना–18 मधील प्रमाणपत्र दिनांक 23.10.2012 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार मंजूर जागेच्या दर्शनी भागात लावावे. 10. सदर आदेशातील वरील सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत रु. 100/- चे स्टॅम्प पेपरवर हमीपत्र सादर करणे आवेदक विभाग यांचेवर बंधनकारक राहील. 11. शासन परिपत्रक क्र.मुद्रांक-2017/अनी.क्र.11/प्र.क्र.133/म-1 (धोरण) दिनांक 24 डिसेंबर, 2020 व शासन परिपत्रक क्र. 1-ज/264 क्र.प्र./2022-जमीन दि. 13.01.2023 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार मुंबई मुद्रांक अधिनियम, 1958 नुसार करारनाम्याचा दस्त निष्पादित करणे प्रतिग्रहीता यांचेवर बंधनकारक राहील. 12. वरील अटी व शर्तींपैकी कोणत्याही अटी व शर्तींचा भंग केल्यास शर्तभंगाबाबत सदर शासकीय जमीन शासन जमा करण्याचा अधिकार शासनास राहील. |