अ.क्र. |
तपशिल/बाब |
स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती |
1 |
विषय |
कृषक जमिनीचे निवास, वाणिज्य व औद्योगीक वापराचे प्रयोजनात विकास परवानगी देण्याबाबत. |
2 |
विकास परवानगी प्रदान करण्याबाबत अधिकार क्षेत्र |
चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या किंवा नगरपरिषदेच्या किंवा नगर पंचायतींच्या किंवा विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दी व ग्रामपंचायतींचे गावठाण क्षेत्रांखेरीज इतर क्षेत्रात मंजूर प्रादेशिक योजनेत स्थित जमिनीचा कृषिव्यतिरिक्त अन्य निवास, वाणिज्य व औद्योगीक वापराचे प्रयोजनात विकास परवानगी प्रदान करण्याबाबत खालील प्रमाणे मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी अधिकार प्रदान केलेले आहे.
अ.क्र |
अधिकाऱ्यांचे पदनाम |
अधिकार प्रदान करण्यात आलेले कार्यक्षेत्र |
परवानगी देणे कामी निश्चित मर्यादा |
|
1 |
मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर |
चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण क्षेत्र |
आराजी 5 एकर वरील सर्व जमिनी |
|
2 |
उपविभागीय अधिकारी, |
वर्ग-1 गावांसाठी |
आराजी 5 एकर पर्यंत |
|
3 |
तहसिलदार |
वर्ग-2 गावांसाठी |
आराजी 5 एकर पर्यंत |
|
टिप:-1 |
चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांचे परि- संवेदनशिल क्षेत्र (Eco Sensitive Zone) सर्व प्रकारचे विकास परवानगी देण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहे. |
|
टिप:-2 |
चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल आकारणीनुसार गावांच्या करण्यात आलेल्या वर्गवारीची वर्ग 1 व 2 च्या गावांबाबतची यादी या कार्यालयाचे संकेतस्थळ www.chanda.nic.in वर उपलब्ध आहे. सदर यादीत नमूद तालुक्यातील गांवे ही वर्ग 1 ची आहेत आणि या व्यतिरिक्त तालुक्यातील इतर गांवे वर्ग 2 चे आहेत. |
|
महानगरपालिकेच्या किंवा नगरपरिषदेच्या किंवा नगर पंचायतींच्या किंवा विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दी मध्ये विकास/बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार संबंधित नियोजन प्राधिकरणाला आहे. आणि संबंधित नियोजन प्राधिकरणाने दिलेल्या विकास/बांधकाम परवानगीनुसार अकृषक आकारणी करुन सनद निर्गमित करण्याचे अधिकार महानगरपालिका, चंद्रपूर करीता उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर व इतर ठिकाणी संबंधित तहसिलदार यांना आहेत. |
|
3 |
विकास परवानगी
करीता
आवश्यक कागदपत्रे |
अ.क्र |
कागदपत्रे / दस्तऐवज |
1 |
Appendix A- 2 UDCPR All pages व त्यावर रुपये 10/- कोर्ट फी स्टॅम्प |
2 |
Appendix – B UDCPR |
3 |
अर्जदारांची आधार कार्ड ची फोटो कॉपी |
4 |
सात –बारा मुळ प्रत (अद्यावत मागील 1 महिन्यातील) |
5 |
गाव नमुना – 8 अ |
6 |
सदर सर्व्हे क्रमांकाचा तलाठी यांचा स्थळ नकाशा |
7 |
जर असल्यास- भुमी अभिलेख विभागाकडील गाव नकाशा |
8 |
मोजणीची “क” प्रत चालु महसूल वर्षातील |
9 |
अधिकार अभिलेख पंजी /पी-01/पी-09 (सत्यप्रत)
(सत्यप्रतची मुळ कॉपी सादर करणे) |
10 |
रिनंबरिंग पर्ची (सत्यप्रत)
(सदर सत्यप्रतची मुळ कॉपी कार्यालयात सादर करणे) |
11 |
Site Photo |
12 |
Marking of Village in Taluka Map |
13 |
Satellite imagery of the site with boundary marking. |
14 |
नगर रचना विभागाचे मंजूर प्रादेशिक योजनेनुसार सदर जमीन/गट क्र.चा भाग प्रमाणपत्र |
15 |
नगर रचना विभागाचे सदर जमीन/गट क्र. चे झोन प्रमाणपत्र |
16 |
अधिकार अभिलेख पंजीमध्ये नमूद व्यक्तीचे नावापासून आज दिनांकास अर्ज केलेल्या अर्जदार यांचे पर्यंत जमिनीचे हस्तांतरणाचे फेरफार पत्रक |
17 |
अधिकार अभिलेख पंजीत नमूद व्यक्ती पासून अर्जदारांपर्यंत जमिनीचे हस्तांतरणाबाबत नावांचे यादीचे अर्जदारयांचे स्वयंघोषणापत्र (एक प्रकारे जमीन धारण वंशावळ) |
18 |
शपथपत्र (साध्या पेपवर तहसिल कार्यालयातील कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे शपथबध्द केलेले शपथपत्र) |
19 |
आवश्यक असल्यास नोंदणी दस्त |
टिप:- 1 |
उक्तनुसार प्रकरणात कागदपत्रे दाखल करण्याकरीता (BPMS) हया संगणकीय प्रणालीत मध्ये प्रत्येक कागदपत्राकरीता स्वतंत्र टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेली असून त्यामध्ये टॅबच्या मागणीनुसार कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. |
टिप:- 2 |
(BPMS) हया संगणकीय प्रणालीत मुळ कागदपत्रे अपलोड करताना स्कॅनरद्वारे स्कॅनकरुन अपलोड करण्यात यावे. मोबाईल मध्ये काढलेले कागदपत्रांचे फोटो व छायांकित प्रतींचे फोटे अपलोड करु नयेत. तसेच स्वतंत्र टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेले असल्यामुळे टॅबच्या मागणीनुसार कागदपत्रे अपलोड केलेले असावे. |
|
4 |
विकास परवानगी
करीता
अर्ज कोठे सादर करावा. |
Ø आता, मंजूर प्रादेशिक योजनेमध्ये विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली प्रमाणे विकास/बांधकाम परवानगी देण्याकरीता Building Plan Management System (BPMS) ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
Ø अर्जदार /विकासक यांनी आपले प्रकरण आवश्यक त्या कागदपत्र/दस्तऐवजासह नोंदणीकृत अभियंता, स्ट्रक्चरल इंजिनिअर, आर्किटेक्ट व नोंदणीकृत Buliding Planner, Designer & Consulting Engineer अथवा पर्यवेक्षक यांच्यामार्फत BPMS प्रणालीत ऑनलाईनद्वारे सादर करावे.
Ø अर्जदार /विकासक यांचे BPMS प्रणालीत ऑनलाईनद्वारे दाखल प्रकरणात तातडीने कार्यवाही होणे कामी सदर कागदपत्रांची हॉर्ड कॉपी उक्तनुसार अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्यांचे कार्यालयात सादर करावी.
Ø औद्योगीक अकृषक प्रकरणात उक्त अधिकार क्षेत्रानुसार उद्योजकांचे प्रकरण पंजीबध्द केल्यानंतर विहित मुदतीत संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त न झाल्यास उद्योजक अभिप्राय मागणी केलेल्या पत्रांच्या प्रतीसह जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे गठीत औद्योगीक गुंतवणूक प्रसार सहाय्यभूत समितीकडे प्रकरणात संबंधित विभागांचे अभिप्राय/अहवाल तात्काळ मिळण्याकरीता सहाय्य करण्याबाबत अर्ज करु शकतात. |
5 |
विकास परवानगी प्रकरणात कार्यवाही करण्याकरीता
जिल्हाधिकारी कार्यालयातील Work Flow
|
Ø अर्जदार /विकासक यांचे विकास / अकृषक प्रकरण नोंदणीकृत अभियंता यांच्यामार्फत BPMS प्रणालीत तात्पुरती मंजूरीकरीता प्रकरण कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील ग्राम महसूल अधिकारी/सहायक महसूल अधिकारी यांचे लॉगीन मध्ये येईल.
Ø अर्जदार /विकासक यांचे ग्राम महसूल अधिकारी/सहायक महसूल अधिकारी यांच्याकडे प्राप्त ऑनलाईन प्रकरणातील कागदपत्रे प्राथमिक तपासणीमध्ये योग्य आढळून आल्यास या कार्यालयाचे ई-ऑफीस प्रणालीमध्ये मा. जिल्हाधिकारी महोदयांकडून सदर प्रकरण पंजीबध्द करण्याकरीता व प्रकरणात जाहीरनामा काढून इतर विभागांचे अहवाल/अभिप्राय मागविण्यासाठी मान्यता घेण्यात येईल.
Ø आणि त्यासोबत BPMS मध्ये अकृषक प्रकरणात खालील Work Flow प्रमाणे काम सुरु असेल,
⇒ |
कागदपत्रे पडताळणी Documents Verification |
ग्राम महसूल अधिकारी |
⇒ |
सहायक अधिक्षक (जमीन) |
⇒ |
उप-जिल्हाधिकारी,
(जमीन) |
⇒ |
नगर रचना विभाग |
|
6 |
प्रकरणात कोणत्या विभागांचे अहवाल / अभिप्राय आवश्यक |
Ø मा. जिल्हाधिकारी महोदयांकडून सदर प्रकरण पंजीबध्द करुन जाहीरनामा काढणे व इतर विभागांचे अहवाल/अभिप्राय मागविण्यासाठी मान्यता प्राप्त झाल्यानंतर निवास, वाणिज्य व औद्योगीक वापराचे प्रयोजनानुसार खालील संबंधित विभागांचे अभिप्राय/अहवाल मागविण्यात येईल.
अ.क्र. |
विभागांचे / कार्यालयांचे नांव |
1 |
नगर रचना व मुल्यनिर्धारण विभाग, चंद्रपूर |
2 |
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर |
3 |
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ,चंद्रपूर |
4 |
जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, चंद्रपूर |
5 |
वनविभाग (संबंधित उपवनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी) |
6 |
संबंधित उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी |
7 |
जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जि.का. चंद्रपूर |
8 |
संबंधित तहसिलदार |
9 |
कार्यकारी अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे विभाग, चंद्रपूर |
10 |
महाराष्ट्र राज्य विज महामंडळ, (महावितरण) (संबंधित कार्यकारी अभियंता) |
11 |
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विज पारेषण कंपनी मर्या, बंगाली कॅम्प, चंद्रपूर |
12 |
जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर |
13 |
सार्वजनिक बांधकाम विभाग, (संबंधित कार्यकारी अभियंता) |
14 |
जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर |
15 |
प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ, चंद्रपूर |
16 |
संबंधित ग्रामपंचायत (ग्रामपंचायत ठरावासह ग्रामपंचायत अधिकारी यांचा अहवाल) |
17 |
आवश्यक असल्यास सदर क्षेत्राचे – वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड / स्थानिक प्राधिकरण/ राष्ट्रीय उद्यानाचे परि- संवेदनशिल क्षेत्रात समाविष्ट असल्यास संबंधित विभागांचे / कार्यालयांचे नाहरकत घेणे आवश्यक राहील. |
18 |
सदर जमिनीच्या वापरानुसार आवश्यक असल्यास इतर संबंधित विभागांचे नाहरकत मागविण्यात येईल. |
|
7 |
सिमांकनाची शिफारस करुन तात्पुरता लेआऊट मंजूर करणे व तात्पुरता लेआऊट चा वापर
जिल्हाधिकारी कार्यालयातील Work Flow
आवश्यक शुल्क
(1 व 2)⇒
शुल्क भरण्याची पध्दत
⇒
तात्पुरता लेआऊट चा वापर⇒
|
Ø या कार्यालयाकडून BPMS मध्ये कागदपत्रांची पडताळणी करुन उपजिल्हाधिकारी, जमीन यांनी नगर रचना विभागाकडे प्रकरण पाठविल्यानंतर नगर रचना विभागाकडून पडताळणी अंती खालील प्रमाणे
Ø सिमांकन मंजूरीचे शिफारस Work Flow
⇒ |
सिमांकन मंजूरीचे शिफारस |
नगर रचना विभाग |
⇒ |
सहायक अधिक्षक (जमीन) |
⇒ |
उप-जिल्हाधिकारी,
(जमीन) |
⇒ |
माननीय जिल्हाधिकारी |
⇒ |
सिमांकन शिफारस व तात्पुरता लेआऊट मंजूरी |
मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रथम विकास शुल्क भरण्याकरीता मंजूरी |
⇒ |
विकास शुल्क भरण्यास परवानगी दिल्यानंतर संबंधित अभियंता यांचे लॉगीन मध्ये ऑनलाईन चलान जनरेट होईल. त्यानुसार अर्जदार यांनी विकास शुल्क भरणा करावा. |
⇒ |
तदनंतर BPMS प्रणालीत
मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून तात्पुरता लेआऊट/ सिमांकन मंजूरी प्रदान |
अ |
1.*जमिनीचे आराजी व वापरानुसार निश्चित होणारे विकास शुल्क*
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 चे कलम 124 व त्यामधील तरतूदीनुसार सदर जमिनीचा विकासासाठी मुद्रांक सिध्द गणका मध्ये (Annual Statement of Rates) जमिनीच्या दारांच्या 0.5% विकास शुल्क निश्चित होईल, आणि तो जमिनीचे वापरानुसार विकास शुल्क गुणांक आकारणी करण्यात येईल. जसे- निवासी वापर – एकपट, वाणिज्य वापर- दुप्पट आणि औद्योगीक वापर- दिडपट इतका अनुज्ञेय राहील.
2.*जमिनीचे केवळ निवासी वापराकरीता निश्चित होणारे अधिमूल्य*
शासन, नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना क्र.टिपीएस-1815/1168/प्र.क्र.290/15/नवी-13, दिनांक 27.11.2018 नुसार मंजूर प्रादेशिक योजनेमध्ये शेती तथा नाविकास विभाग या वापर विभागामध्ये गावठाणापासून विवक्षित अंतरामध्ये कृषक जमिनीचा अनुज्ञेय करावयाच्या रहिवास वापरासाठी विकास परवानगी देण्याकरीता मुद्रांक सिध्द गणका मध्ये (Annual Statement of Rates) जमिनीच्या दारांच्या 15% अधिमूल्य निश्चित होईल, सदर अधिमूल्य जमिनीचे फक्त निवासी वापराकरीता अनुज्ञये राहील. आणि वाणिज्य व औद्योगीक वापराकरीता अधिमूल्य लागू नाही.
*या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लागु नाही.*
|
ब |
मा.जिल्हाधिकारी यांच्याकडून तात्पुरता लेआऊट मंजूर करताना प्रथम मान्यता दिल्यानंतर निश्चित विकास शुल्क भरण्याकरीता संबंधित अभियंता यांचे लॉगीनमध्ये Government Receipt Accounting System (GRAS) द्वारे MTR Form Number -6 मध्ये चलान जनरेट होईल, सदर चलान नुसार विकास शुल्क अर्जदार हे ऑनलाईन किंवा चलान कॉपीसह संबंधित बँकमध्ये थेट जमा करु शकतात. |
क |
मा.जिल्हाधिकारी किंवा संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून तात्पुरता लेआऊट मंजूर केल्यास, त्यानुसार केवळ सिमांकन शिफारस केलेली असते, तात्पुरता लेआऊट नुसार भुखंड खरेदी-विक्री करता येत नाही. आणि तात्पुरता लेआऊट मंजूरीनंतर, अंतिम मंजूरी प्राप्त केल्याशिवाय सदर तात्पुरत्या मंजूरीनुसार 7/12 अभिलेखात दुरुस्ती करण्याची कार्यवाही करण्यात येत नाही. तसेच भूमी अभिलेख विभागांकडून सिमांकनानुसार करण्यात येणाऱ्या मोजणी मध्ये सिमांकन मंजूरीचे आदेश नमूद असणे अनिवार्य आहे. |
|
8 |
अंतिम लेआऊट मंजूर करणे |
अंतिम मंजूरी –
सिमांकन मोजणी नंतर अर्जदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे अर्ज करुन त्यांचे प्रकरणात प्राप्त सर्व विभागांचे अभिप्राय हे छायांकित प्रती व PDF Format मध्ये प्राप्त करुन घ्यावे.
तद्नंतर अंतिम मंजूरी करीता संबंधित अभियंता यांच्याकडून प्रकरण प्राप्त झाल्यानंतर
Work Flow ⇓
⇒ |
कागदपत्रे पडताळणी Documents Verification |
ग्राम महसूल अधिकारी |
⇒ |
सहायक अधिक्षक (जमीन) |
⇒ |
उप-जिल्हाधिकारी,
(जमीन) |
⇒ |
नगर रचना विभाग |
तदनंतर अंतिम मंजूरीची शिफारस
Work Flow ⇓
⇒ |
अंतिम मंजूरीचे शिफारस |
नगर रचना विभाग |
⇒ |
सहायक अधिक्षक (जमीन) |
⇒ |
उप-जिल्हाधिकारी,
(जमीन) |
⇒ |
माननीय जिल्हाधिकारी |
⇒ |
मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून BPMS प्रणालीत
अंतिम विकास परवानगी / लेआऊटला मंजूरी प्रदान करण्यात येईल. |
⇒ |
तदनंतर BPMS मधील परवानगीनुसार ऑफलाईन मध्ये सदर प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांना अकृषक आकारणी निश्चित करुन सनद निर्गमित करणेसाठी पाठविण्यात येईल. |
प्रकरणात सबंधित तहसिलदार यांनी सनद निर्गमित केली व त्यानंतर त्यानुसार भूमी अभिलेख विभागाकडून कमी जास्त पत्रक तयार करण्याची कार्यवाही केली की, प्रकरणातील कार्यवाही पुर्ण होवून त्यानुसार 7/12 अभिलेख अद्यावत होईल. |
|
9 |
अंतिम निर्णय घेणारे अधिकारी |
मा.जिल्हाधिकारी, चंद्रपूर |
10 |
निर्णय प्रक्रियेत लागणारा कालावधी |
चौकशी अंती प्रकरणातील कागदपत्रे व संबंधित विभागांचे अहवाल मुदतीत प्राप्त होवून परिपूर्ण असल्यास प्रस्तावावर 60 दिवसांमध्ये निर्णय घेण्याची कार्यवाही करण्यात येते. |
11 |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय |
कृषक जमिनीचे निवास, वाणिज्य व औद्योगीक वापराचे प्रयोजनात विकास परवानगी देण्याबाबत, संबंधित शासन अध्यादेश, अधिसूचना, शासन निर्णय, परिपत्रक व या कार्यालयाचे आदेश व परिपत्रकाकरीता
येथे क्लिक करावे. |