विषय:- महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961, अन्वये अतिरिक्त घोषीत करण्यात आलेली शेतजमीन/सिलींग वाटपाआधारे मिळालेली शेतजमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री करण्याकरीता कामकाजाची आदर्श कार्यपध्दती. (Standard Operating Procedure)
अ.क्र. |
तपशिल/बाब |
स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती |
1 |
विषय |
अतिरिक्त घोषीत करण्यात आलेली शेतजमीन/सिलींग वाटपाआधारे मिळालेली शेतजमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री करण्याबाबत. |
2 |
सिलींग जमीन विक्री परवानगी प्रदान करण्याबाबत अधिकार क्षेत्र |
चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961, अन्वये अतिरिक्त घोषीत करण्यात आलेली शेतजमीन/सिलींग वाटपाआधारे मिळालेली शेतजमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी प्रदान करण्याबाबत मा. अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना अधिकार प्रदान केलेले आहे.
अ.क्र |
अधिकाऱ्यांचे पदनाम |
अधिकार प्रदान करण्यात आलेले कार्यक्षेत्र |
परवानगी देणे कामी निश्चित मर्यादा |
1 |
मा. अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर |
संपूर्ण चंद्रपूर जिल्हा |
सिलींग जमीनीची विक्री परवानगी प्रकरणांत अनर्जित रक्कमेची आकारणी करून परवानगी प्रदान करण्यासाठी“अपर जिल्हाधिकारी” हे “सक्षम प्राधिकारी” असतील. |
सिलींग जमीन कृषक व औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री परवानगीकरीता मुळ प्रकरण /प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांचेमार्फत उपविभागीय अधिकारी यांनी प्रस्ताव/अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. |
|
3 |
सिलींग जमीन विक्री परवानगी
करीता
आवश्यक कागदपत्रे |
अ.क्र |
कागदपत्रे / दस्तऐवज |
1 |
सिलींग जमीन विक्री करणेबाबत अर्जदाराचा अर्ज रूपये 10/- कोर्ट फी स्टॅम्प |
2 |
सिलींग जमीन कोणत्याआदेशान्वये मिळाली याबाबतचे कागदपत्र |
3 |
जमीन विक्री बाबत कारण |
4 |
7/12, नमुना 8 अ व नकाशा |
5 |
सन 1954-55 ची अधिकार अभिलेख पंजी |
6 |
रिनंबरिंग पर्ची |
7 |
फेरफार पंजी |
8 |
जमीनीची विक्री झालेली असल्यास सर्व विक्रीचे आदेश |
9 |
जाहिरनामा (प्रसिध्दी प्रतिवेदनासह) |
10 |
प्रकरणांत संबंधित तलाठी यांचा अहवाल |
11 |
जमीन भूसंपादन, महानगरपालिका/नगर पालिका विकास आराखडयात, लाभ क्षेत्रात,बूडीत क्षेत्रात सार्वजनिक कामासाठी,किंवा इतर कोणत्या प्रकल्पात जाते का?
याबाबत अहवाल |
12 |
जमीन विक्रेता भुमीहीन होत आहे किंवा कसे याबाबत पुरावा |
13 |
जमीन विक्रीदाराचे बयाण(सक्षम अधिका-यांच्या सही,शिक्क्यासह) |
14 |
जमीन खरेदीदाराचे बयाण (सक्षम अधिका-यांच्या सही, शिक्क्यासह) |
15 |
जमीन विक्रीदाराच्या वारसांचे शपथपत्र (नाहरकत) |
16 |
जमीन विक्रीदाराच्या जातीचा पुरावा |
17 |
जमीन खरेदीदाराच्या जातीचा पुरावा |
18 |
विक्रीदार व खरेदीदार यांच्यात झालेला करारनामा(विक्री करारनामा) |
19 |
सह दुय्यम निबंधक यांचे सिलींग जमीनीचे चालु आर्थिक वर्षाचे मुल्यांकन अहवाल |
20 |
शासनाच्या नियमानुसार सिलींग जमीनीची अनर्जित रक्कम भरण्यास तयार असल्याबाबत व शासनाचे अटि व शर्ती मान्य असल्याबाबत प्रतिज्ञापत्र/शपथपत्र. |
21 |
तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचा मौका चौकशी अहवाल |
22 |
खरेदीदाराचे जमीन खरेदीचे प्रयोजन कृषक असल्यास खरेदीदार शेतकरी असल्याचा पुरावा म्हणुन 7/12 सादर करावा. |
23 |
जर खरेदीदार व्यक्ती असेल आणि औद्योगिक प्रयोजनाकरीता जमीन खरेदी करीत असेल तर शेतजमीन खरेदीची परवानगी आवश्यक नाही. (विदर्भ कुळवहिवाट अधिनियम, 1958 चे कलम 89 अ) |
24 |
खरेदीदार कंपनी किंवा शेतकरी नसलेला व्यक्ती असल्यास शेतजमीन खरेदीची परवानगी आवश्यक आहे. (विदर्भ कुळवहिवाट अधिनियम, 1958 चे कलम 89) |
25 |
सिलींग जमीन ही पेसा कायद्याअंतर्गत येते का याबाबत अहवाल |
26 |
उपविभागीय अधिकारी यांच्या स्वंयस्पष्ट अभिप्रायासह 22 मुद्दयांचा अहवाल |
27 |
सिलींग जमीनीस वनसंवर्धन कायदा 1980 चे तरतुदी लागु आहे किंवा कसे याबाबत वनविभागाचा अभिप्राय. |
28 |
प्रकरणांत औद्योगिक प्रयोजन असल्यास नगर रचना आणि मुल्य निर्धारण विभागाचा अभिप्राय |
|
4 |
अर्ज कोठे सादर करावा. |
Ø उक्तनुसार प्रकरणात कागदपत्रे दाखल करण्याकरीता तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह अर्ज सादर करावा. |
5 |
सिलींग जमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री करण्याकरीता
|
Ø अर्जदार यांचे अर्ज प्राप्त झालेनंतर तहसीलदार यांचे स्तरावरून प्रकरण सुरू करण्यांत येऊन तलाठी अहवाल आवश्यक कागदपत्रासह मागविण्यात येईल. सदर प्रकरणांत जाहिरनामा काढून आक्षेप/हरकती घेऊन प्रकरण/प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत अपर जिल्हाधिका-यांचे मंजुरीकरीता प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांचे लॉगीन मध्ये येईल.
Ø अर्जदार यांचे अर्जाचे अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत प्राप्त प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्राची महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांचेकडून पडताळणी करण्यात येऊन प्राथमिक तपासणीमध्ये योग्य आढळून आल्यास या कार्यालयाचे ई-ऑफिस प्रणालीमध्ये सदर प्रकरण पंजीबध्द करून मा.अपर जिल्हाधिकारी यांचेकडे मंजुरीकरीता प्रकरण/प्रस्ताव सादर करण्यात येईल.
Ø भुसूधार कार्यासनावर सिलींग जमीन विक्री परवानगीकरीता खालील Work Flow प्रमाणे काम सुरु असेल,
⇒ |
कागदपत्रे पडताळणी Documents Verification |
महसूल सहायक / सहा. महसूल अधिकारी |
⇒ |
सहायक अधिक्षक (जमीन) |
⇒ |
उप-जिल्हाधिकारी,
(जमीन) |
⇒ |
मा.अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर |
|
6 |
प्रकरणांत कोणत्या विभागाचे अहवाल/ अभिप्राय आवश्यक |
Ø तहसीलदार यांनी प्रकरण पंजीबध्द करून जाहिरनामा काढणे व इतर विभागांचे अहवाल/अभिप्राय कृषक व औद्योगिक प्रयोजनाकरीता खालील संबंधित विभागाचे अभिप्राय/अहवाल मागविण्यात येईल.
अ.क्र. |
विभागाचे/कार्यालयाचे नांव |
1 |
संबंधित उपविभागीय कार्यालय |
2 |
संबंधित तहसिल कार्यालय |
3 |
दुय्यम निबंधक कार्यालय |
4 |
संबंधित तलाठी कार्यालय |
5 |
विक्री ज्या प्रयोजनाकरीता आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाचे अभिप्राय |
|
7
|
आवश्यक शुल्क
शुल्क भरण्याची पध्दत |
अ |
*जमिनीचे आराजी व वापरानुसार निश्चित होणारे शुल्क*
महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1961 चे कलम 29 आणि महाराष्ट्र शेतजमीन 1962 चे सुधारीत नियम 1975 व त्यापुढील सुधारणा नियम 2001(महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 19/10/2001) मधील तरतूदीनुसार
1. कृषक प्रयोजनार्थ:- दुय्यम निबंधक यांचे शिघ्रसिध्दगणकानुसार येणारे मुल्याच्या/ रक्कमेच्या 50 टक्के रक्कम आकारणी करण्यात येईल.
2. औद्योगिक/अकृषक प्रयोजनार्थ:- दुय्यम निबंधक यांचे शिघ्रसिध्द गणकानुसार येणारे मुल्याच्या/ रक्कमेच्या 75 टक्के रक्कम आकारणी करण्यात येईल. |
ब |
मा. अपर जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर निश्चित शुल्क/रक्कम भरण्याकरीता संबंधित अभियंता यांचे लॉगीनमध्ये Government Receipt Accounting System (GRAS) द्वारे MTR Form Number -6 मध्ये चलान जनरेट होईल, सदर चलान नुसार विकास शुल्क अर्जदार हे ऑनलाईन किंवा चलान कॉपीसह संबंधित बँकमध्ये थेट जमा करु शकतात. |
|
8 |
अंतिम आदेश पारीत करणे |
अंतिम आदेश –
प्रकरणांत अर्जदार यांनी रक्कम जमा केलेबाबत चलान डिफेस झाल्याची खात्री करून आदेश पारीत करण्यात येते. |
9 |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय |
अ.क्र. |
विषय |
शासन अधिसुचना दिनांक |
शासन निर्णय PDF |
1 |
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम,1961 |
19.10.2001 |
क्लिक करा |
2 |
महाराष्ट्र शेतजमीन (सुधारणा) नियम,1975 मधील नियम 12
|
– |
क्लिक करा |
|
10 |
अंतिम निर्णय घेणारे अधिकारी |
मा.अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर |
11 |
निर्णय प्रक्रियेत लागणारा कालावधी |
90 दिवस |