बंद

स्वातंत्र्याचा अमृत ​​महोत्सव

  • 9 ऑगस्ट 1942 ला क्रांती दिनी महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोनलाचा बिगुल फुंकला. 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रसंतांच्या विचारातून स्वातंत्र्याची पहिली ठिणगी चिमूरमध्ये पडली आणि चिमूर स्वतंत्र झाले. मात्र इंग्रजांनी तीन दिवस नागरिकांना घराबाहेर पडू दिले नाही. इंग्रजांची दडपशाही रोखण्यासाठी 16 वर्षीय बालाजी रायपूरकर व इतर नागरिक बाहेर पडले. यात बालाजी रायपुरकर शहीद झाले. इंग्रजांच्या पारतंत्र्यात असतांना देशातील स्वतंत्र होणारे पहिले गाव म्हणून चिमूरचा इतिहास लिहिला गेला. विशेष म्हणजे बर्लिन येथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चिमूर स्वतंत्र झाल्याची घोषणा रेडीओद्वारे केली. इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराविरुध्द लढण्याचे धाडस चिमूर आणि आष्टी या गावांनी केले
    9 ऑगस्ट 1942 ला क्रांती दिनी महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोनलाचा बिगुल फुंकला. 16 ऑगस्ट रोजी राष्ट्रसंतांच्या विचारातून स्वातंत्र्याची पहिली ठिणगी चिमूरमध्ये पडली आणि चिमूर स्वतंत्र झाले. मात्र इंग्रजांनी तीन दिवस नागरिकांना घराबाहेर पडू दिले नाही. इंग्रजांची दडपशाही रोखण्यासाठी 16 वर्षीय बालाजी रायपूरकर व इतर नागरिक बाहेर पडले. यात बालाजी रायपुरकर शहीद झाले. इंग्रजांच्या पारतंत्र्यात असतांना देशातील स्वतंत्र होणारे पहिले गाव म्हणून चिमूरचा इतिहास लिहिला गेला. विशेष म्हणजे बर्लिन येथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी चिमूर स्वतंत्र झाल्याची घोषणा रेडीओद्वारे केली. इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराविरुध्द लढण्याचे धाडस चिमूर आणि आष्टी या गावांनी केले.