चंद्रपूर जिल्हा आरोग्य विभाग – एक परिचय
चंद्रपूर जिल्ह्याचा आरोग्य विभाग हा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कार्यरत असलेली एक महत्त्वपूर्ण शासकीय यंत्रणा आहे. या विभागामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे कार्य केले जाते.
विभागाची उद्दिष्ट्ये :-
- जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांना निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करणे.
- रुग्णांना त्यांचे जवळचे ठिकाणी उत्कृष्ठ ,दर्जेदार गुणात्मक व तत्पर सेवा उपलब्ध करुन देणे.
- जन्मदर आणि मृत्यूदर कमी करणे, तसेच माता आणि बालमृत्यू रोखणे.
- संचारी आणि असंचारी रोगांचे नियंत्रण व प्रतिबंध करणे.
- कुटुंब कल्याण कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे.
- आरोग्य शिक्षण आणि जनजागृतीद्वारे लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता वाढवणे.
- सर्वांसाठी सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करणे.
- राष्ट्रीय आरोग्य धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
विभागाची रचना :-
जिल्हा आरोग्य विभागाचे प्रमुख जिल्हा शल्य चिकित्सक (Civil Surgeon) असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्तरांवर आरोग्य सेवा पुरविल्या जातात, ज्यात खालील घटकांचा समावेश होतो:
* जिल्हा रुग्णालय: चंद्रपूर शहरात असलेले हे मोठे रुग्णालय असून येथे विशेषज्ञ डॉक्टरांची टीम आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. येथे सामान्य आजारांपासून ते गंभीर आजारांवर उपचार केले जातात.
* उपजिल्हा रुग्णालये: जिल्ह्यामध्ये 5 उपजिल्हा रुग्णालये आहेत, जी तालुका स्तरावर आरोग्य सेवा पुरवतात.
* ग्रामीण रुग्णालये: जिल्हामध्ये एकुण 9 ग्रामिण रुग्णालये आरोग्य सेवा आणि काही प्रमाणात विशेषज्ञ सेवा उपलब्ध असतात.
* ट्रामा केअर युनिट : जिल्हामध्ये एकुण 2 कार्यान्वित आहेत