बंद

पुनर्वसन शाखा

विषय :-     महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम,1976, 1986, 1999 अन्वये अधिसुचित केलेल्या पाटबंधारे / विज प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील ज्या भुधारकांच्या जमिनी व घरे भुसंपादीत केलेल्या आहेत अशा प्रकल्पबाधित भुधारकांना व त्यांच्या वर अवलंबुन असलेल्या कुटूंबातील सदस्यांना नौकरीसाठीचे प्रकल्पग्रस्त प्रपत्र वितरण संबधाने करावयाची आदर्श कार्यपध्दती.

 

अ.क्र तपशिल / बाब स्पष्टीकरण / कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती
 

1

 

विषय :- प्रकल्पग्रस्त प्रपत्र प्रकरण मंजुरीचे प्रदान केलेले अधिकारी

सामान्य प्रशासन विभाग, मुंबई शासन निर्णय क्रमांक एईएम-1080 /35/16-अ, दिनांक 21 जानेवारी,1980 अन्वये प्रकल्पग्रस्त प्रपत्र प्रकरण मंजुरी व प्रपत्र वितरणाची कार्यवाही
अ.क्र अधिका-यांचे पदनाम प्रपत्र प्रदान करण्यात आलेले अधिकार
1 मा.जिल्हाधिकारी शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी,1980
2 जिल्हा पुनर्वसन अधिकारी शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी,1980
 

2

 

प्रकल्पग्रस्त प्रपत्र करीता आवश्क असलेले कागदपत्रे

 

Ø  1. सविस्तर अर्ज व त्याला रुपये 10/- कोर्ट फी स्टॅम्प.

Ø  2. भुसंपादीत जमीन किंवा घर भुसंपादनाचे कलम-4(1), कलम-9 व कलम-12(2) चा नोटीस, अवार्ड प्रत किंवा मोबदला वाटप पंजीची प्रमाणित प्रत.

Ø  3. मुळ प्रकल्पग्रस्त (मय्यत) असल्यास भुसंपादनाचे नोटीस प्रमाणे त्यांचे सर्व वारसानाचे रुपये 100/- चे स्टॅम्पवर संमतीपत्र. प्रमाणित करुन सादर करणे.

Ø  4. सामुहीक शेतजमीन किंवा घर भुसंपादन झाले असल्यास सर्वाचे संमतीपत्र मय्यत असल्यास सर्व वारसानाचे रुपये 100/- चे स्टॅम्पवर संमतीपत्र. प्रमाणित करुन सादर करणे.

Ø  5. शपथपत्र मुळ प्रकल्पग्रस्तांचे किंवा मय्यत असल्यास वारसानाचे.

Ø  6. शपथपत्र नामनिर्देशीत व्यक्तींचे व नाते संबधाने आवश्यक शासकीय पुरावे.

Ø  7. मुळ प्रकल्पग्रस्तांचे वंशावड शपथपत्र (सर्व वारसानाचा उल्लेख करणे आवश्यक)

Ø  8. प्रपत्र बदलवुन द्यावयाचे असल्यास मुळ प्रपत्र कार्यालयात जमा करणे आवश्यक.

Ø  9. प्रकल्पग्रस्तांचे कुटूंबातील व्यक्ती किंवा वारसान मय्यत असल्यास त्याचा मृत्यु दाखला प्रकरणात आवश्यक आहे.

Ø  10. सर्व वारसानाचे आधार कार्डची छायांकीत प्रत.

Ø  11. शिधापत्रिकाची प्रथम पान व कुटूंब विवरणाची छायांकीत प्रत.

Ø  12. इत्यादी प्रकरणात आवश्यक असणारे पुरावे.

 

3

 

अर्ज कोठे सादर करावा.

Ø  1. मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर

Ø  2. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) चंद्रपूर

4 आवश्यक शुल्क Ø  1. अर्जाला रुपये 10/- कोर्ट फी स्टॅम्प.
 

5

 

प्रकल्पग्रस्त प्रपत्र प्रकरणात कार्यवाही.

 

Ø  1. अर्जाची तपासणी करुन यापुर्वी या कार्याकडुन प्रकल्पग्रस्त प्रपत्र वितरण झाले किंवा कसे याबाबत संगणकीकरण यादीची तपासणी करणे व टिपणीमध्ये नमुद करणे.

 

Ø  2. संबधित भुसंपादन अधिकारी व यंत्रणा यांचे कार्यालयाकडुन भुसंपादन मालमत्ता उदा. शेतजमीन किंवा घर याबाबत अहवाल व अभिलेखे मागविणे.

 

Ø  3. प्रकल्प निहाय नियुक्ती प्राधिकारी यांचेकडुन अभिलेखे तपासुन ना-हरकत सविस्तर अहवाल मागविणे. (चंद्रपुर महाऔष्णिक केंद्र, चंद्रपुर हे प्रकल्पग्रस्तांना नौकरी देण्यास बंधनकारक आहे.)

 

Ø  4. भुसंपादीत मौजाचे मंडळ अधिकारी (महसुल) यांचा प्रकल्पग्रस्त व्यक्तीची गृह चौकशी करुन स्थानिक कुटूंब चौकशी अहवाल व मय्यत किंवा हय्यात असलेल्या व्यक्तीचे कुटूंब विवरण अहवाल मागविणे.

 

Ø  5. भुसंपादीत मौजाचे अनुषंगाने जाहिरनामा प्रसिध्दी करणे, आक्षेप किंवा तक्रार मुदतीचे आत मागविणे.

 

Ø  6. चुकीचा अहवाल किंवा अभिलेखे सादर केल्यास वरिष्ठांचे निदर्शनास आनुन देणे.

 

Ø  7. यापुर्वी प्रकल्पग्रस्त प्रपत्र वितरीत झाले असल्यास टिपणी सादर करुन प्रकरण नस्ती करणे. इत्यादी कामे.

 

 

6

 

प्रकरणात कोणत्या विभागाचे अहवाल / अभिप्राय आवश्यक आहे.

Ø  1. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर यांचा सविस्तर अहवाल.

Ø  2. कार्यकारी अभियंता,मध्यम प्रकल्प विभाग क्रं.1, चंद्रपूर

Ø  3. उपसंचालक (कोर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर

Ø  4. उपविभागीय अधिकारी, तथा भुसंपादन अधिकारी,चिमुर

Ø  5. उपविभागीय अधिकारी, तथा भुसंपादन अधिकारी, गोंडपिपरी

Ø  6. उपविभागीय अधिकारी, तथा भुसंपादन अधिकारी, मुल

Ø  7. संबधित मंडळ अधिकारी यांचा स्थानिक कूटूंब अहवाल

Ø  8. प्रकरण निहाय मौजामध्ये जाहिरनामा प्रसिध्दी करुन अहवाल मागविणे.

Ø  9. सर्व अहवाल व अभिप्राय प्राप्त झालेनंतर टिपणी मान्यतेस सादर करणे.

 

7

 

अंतिम निर्णय घेणारे.

Ø  1. मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर

Ø  2. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) चंद्रपूर

 

8

 

निर्णय प्रक्रियेत लागणारा कालावधी.

Ø  चौकशी अंती प्रकरणातील सर्व आवश्यक कागदपत्रे व संबधित विभागाचे अहवाल मुदतीत प्राप्त होवुन परिपुर्ण असल्यास प्रस्तावावर 60 दिवसांमध्ये निर्णय घेण्याची कार्यवाही करण्यात येते.
 

 

 

9.1

संबधित शासन संदर्भ, शासन निर्णय व दिनांक
अ.क्र विषय व दिनांक शासन निर्णय
1

 

प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबुन असणा-या व्यक्तींना शासकीय सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 मधील भरतीबाबत प्राथम्यक्रम.

दिनांक 21 जानेवारी,1980

क्लिक करा
 

9.2

 

2

न्याय नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भुमी संपादन पुनर्वसन व  पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम,2013 क्लिक करा
9.3 3 प्रकल्पबाधित व्यक्तींना व त्यांनी नामनिर्देशीत केलेल्या त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करतांना अनुसरवयाची कार्यपध्दती. दिनांक 29 जानेवारी,2025 क्लिक करा