बंद

सामुहीक वनहक्क

विषय:-  अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम,2006 व नियम, 2008 सुधारणा नियम, 2012 अन्वये सामुहीक वनहक्क दावा दाखल करण्याची पध्दती(Process of Community Forest Right)

 

अ.क्र. तपशिल/बाब स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती
1 विषय सामुहीक वनहक्क दावा दाखल करण्याची कार्यपध्दती
2 सामुहीक वन हक्काचा दावा दाखल करण्याची कार्यपध्दती⇒
  गावामध्ये उपविभागमध्ये जिल्हयामध्ये
ग्रामस्तरीय वनहक्क समिती उपविभाग स्तरीय वनहक्क समिती जिल्हास्तरीय वनहक्क

समिती

 

3 सामुहीक वनहक्क दावा दाखल कुठे करावा  

ग्रामस्तरीय वनहक्क समितीला वनहक्क दावा दाखल करावा

सामुहीक दावा दाखल करतांना   लागणारेआवश्यक कागदपत्रे⇒  

अ.क्र. कागदपत्रे / दस्तऐवज
   
1 ग्रामपंचायतीचा सचिव यांनी उपविभागीय स्तरीय समितीला सामूहिक दावा दाखल केल्याचे पत्र
2 वनजमिनीवरील सामूहिक हक्कांसाठीच्या दाव्यांचा अर्ज व मागणी करणाऱ्यांची स्वाक्षरी प्रत
3 सामुदायिक वन संसाधन हक्कासाठी दाव्यांचा अर्ज (नमुना “ग”)
4 मागणी करण्यात आलेल्या जागेचा 7/12 व तलाठी नकाशा
5 निस्तार पत्रक
6 नियम 12 (1) अन्वये वन हक्क पडताळणीसाठीची सुचना
7 सामूहिक दाव्याबाबतचा पडताळणी निष्कर्ष अर्ज
8 वडीलधाऱ्या व्यक्तींचे लेखानिविष्ट कथन
9 नजरी नकाशा
10 संयुक्त चौकशी अहवाल
11 ग्रामसभेची सुचना (वन हक्क समितीच्या निष्कर्षावर विचार करण्यासाठी)
12 सामूहिक दाव्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव. ग्राम सभेचा ठराव (ग्रामसभेच्या बैठकीची गणपूर्ती ग्रामसभेच्या सर्व सदस्य संख्येला अर्ध्यापेक्षा कमी नसतील इतक्या सदस्य संख्येने होईल. परंतु, उपस्थित सदस्यांच्या किमान एक-तृतीयांश इतक्या महिला असतील.परंतु आणखी असे की, जेथे वनहक्कांसंबंधी कोणतेही निर्णय संमत करावयाचे असल्यास किमान पन्नास टक्के इतक्या वनहक्कांची मागणी करणारे दावेदार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील.)
13 ग्रामसभेच्या ठरावामध्ये उपस्थित असलेल्या मागणी करणाऱ्या दावेदारांची स्वाक्षरी असलेली यादी. (ग्रामसभेच्या ठरावाचे कार्यवृत्तांत ज्या रजिस्टर मध्ये ग्रामसेवकाने लिहिले आहे त्या रजिस्टरची झेरॉक्स प्रत) परंतु नमुना खालील प्रमाणे असावा.

 

अ.क्र. विषय मतदार यादी अ.क्र. ग्रामस्थांचे नाव स्वाक्षरी
14 सामुहीकवनहक्कमागणीकेलेल्यागावातीलएकुणमतदारयादी.
15 सरपंच यांचे प्रमाणपत्र.
16 इतर कागदपत्र
टिप:- उक्तनुसार सामुहीक प्रकरणात लागणारे कागदपत्रे आवश्यक आहे.
4. उपविभागीय स्तरीय समितीची रचना⇒  

अध्यक्ष सदस्य सदस्य सदस्य सचिव
उपविभागीय

अधिकारी

सहाय्यक

उपवनसंरक्षक

पंचायत समिती 3 सदस्य अशासकीय सदस्य) आदिवासी विभागाचा उपविभागीय स्तराचे कामपाहणारा अधिकारी(प्रकल्पअधिकारीएकात्मिकआदीवासीविभाग)

Ø  दाव्यांचे अर्ज अर्जदार यांना पुरेसे व मोफत उपलब्ध आहे याची खात्री करणे.

Ø  आवश्यक गणपूर्ती नुसार ग्रामसभेच्या बैठका मुक्त वातावरणात चालवल्या जातात याची खात्री करणे.

Ø  ग्रामस्तरीय वनहक्क समिती मार्फत प्राप्त झालेल्या दाव्यांची पडताळणी करणे.

Ø  उपविभागीय अधिकाराव्दारे प्रस्तावित वनहक्कांचा अभिलेखाच्या मसुदयासह दावे अंतिम निर्णयासाठी जिल्हास्तिरीय वनहक्क समितीकडे पाठविणे .

उपविभागीय स्तरीय समितीची कार्य

 

5. जिल्हास्तरीय समितीची रचना⇒
अध्यक्ष सदस्य सदस्य सचिव
जिल्‍हाधिकारी उपवनसंरक्षक जिल्हा परिषदेने नेमलेले 3 सदस्य (अशासकीय सदस्य) अतिरिक्त जिल्हाधिकारी

Ø  उपविभास्तरीय समितीव्दारे तयार करण्यात आलेल्या वनहक्कांच्या हक्क मागण्या व अभिलेख विचारात घेईल व त्यास अंतिम मान्यता देईल

Ø  मान्य झालेल्या वनहक्कांचा इतर सरकारी दस्ताऐवजामध्ये समावेश करण्यासाठी निर्देश देणे.

Ø  अंतिमरुप देण्यात आलेल्या वनहक्कांचे अभिलेख प्रसिध्दी करण्यात आल्याची खात्री करणे.

 

 

जिल्हास्तरीय समितीची कार्य

 

विनंती अर्ज (अपिल)करण्याची प्रक्रिया

 

6. ग्रामसभा, उपविभाग व जिल्हा स्तरिय समितीचा निर्णय मान्य नसल्यास त्यांच्या विरोधात विनंती अर्ज (अपिल)करण्याची प्रक्रिया Ø  ग्रामसभेचा निर्णय मान्य नसलेल्या व्यक्तींना 60 दिवसांच्या आत उप विभागस्तरीय समितीकडे अपिल करता येते.

Ø  उपविभाग स्तरीय समितीचा निर्णय मान्य नसलेल्या व्यक्ती 60 दिवसांच्या आत जिल्हास्तरीय समितीकडे अपिल करता येईल.

Ø  जिल्हास्तरीय समिती अपिल दाखल करुन मान्यता किंवा फेटाळील किंवा उपविभागीय समितीकडे पुनर्विचारासाठी परत पाठवेल.

Ø  त्यानंतर जिल्हास्तरीय समिती अपिल अर्ज विचारात घेऊन अर्ज स्वीकारल्याचा किंवा फेटाळल्याचा आदेश देईल.

7 अंतिम निर्णय घेणारी समिती जिल्हास्तरीय वनहक्क समिती
8. कायदा व शासन निर्णय  

अ.क्र. विषय शासन निर्णय क्रमांक व दिनांक शासन निर्णय PDF
1. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम,2006 व नियम, 2008 मधील नियम 4 (1)(ड)अन्वये सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFRMC) गठीत करणे व चालविण्याकरिता मार्गदर्शक तत्वे तयार करणे आदिवासी विकास

विभाग

दि.24.06.2016

क्लिक करा
2. सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समितीची स्थापना करण्याबाबत. आदिवासी विकास

विभाग

दि. 01.10.2015

क्लिक करा
3. सामुहिक वनहक्कांचे संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे तयार करण्याबाबत आदिवासी विकास

विभाग

दि. 06.07.2017

क्लिक करा
4. सामुहिक वनहक्कांचे संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती व तालुकास्तरीय कन्व्हर्जन्स समिती स्थापन करणे व जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समिती व राज्यस्तरीय सुकाणु समितीमध्ये बदल करणेबाबत आदिवासी विकास

विभाग

दि 22.11.2021

क्लिक करा
5.. सामुहिक वनहक्क मान्यता प्राप्त ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत्‍ अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित करण्याबाबत. नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) दि.30.11.2021 क्लिक करा
6. सामुहिक वनहक्कांचे संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरीय कन्व्हर्जन्स समिती स्थापन करणे व जिल्हास्तरीय कन्व्हर्जन्स समिती व राज्यस्तरीय सुकाणू समितीमध्ये बदल करणेबाबत. महसूल व वन विभाग दि.12.09.2022 क्लिक करा