बंद

सिलिन जमीन विक्री परवानगी

 विषय:-    महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961, अन्वये अतिरिक्त घोषीत करण्यात आलेली शेतजमीन/सिलींग वाटपाआधारे मिळालेली शेतजमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री करण्याकरीता कामकाजाची आदर्श कार्यपध्दती. (Standard Operating Procedure)

अ.क्र. तपशिल/बाब स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती
1 विषय अतिरिक्त घोषीत करण्यात आलेली शेतजमीन/सिलींग वाटपाआधारे मिळालेली शेतजमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री करण्याबाबत.
2 सिलींग जमीन विक्री परवानगी प्रदान करण्याबाबत अधिकार क्षेत्र      चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961, अन्वये अतिरिक्त घोषीत करण्यात आलेली शेतजमीन/सिलींग वाटपाआधारे मिळालेली शेतजमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री परवानगी प्रदान करण्याबाबत मा. अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना अधिकार प्रदान केलेले आहे.

अ.क्र अधिकाऱ्यांचे पदनाम अधिकार प्रदान करण्यात आलेले कार्यक्षेत्र परवानगी देणे कामी निश्चित मर्यादा
1 मा. अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर संपूर्ण चंद्रपूर जिल्हा सिलींग जमीनीची विक्री परवानगी प्रकरणांत अनर्जित रक्कमेची आकारणी करून परवानगी प्रदान करण्यासाठी“अपर जिल्हाधिकारी” हे “सक्षम प्राधिकारी” असतील.
 

सिलींग जमीन कृषक व औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री परवानगीकरीता मुळ प्रकरण /प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांचेमार्फत उपविभागीय अधिकारी यांनी प्रस्ताव/अहवाल जिल्हाधिकारी  कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.

3 सिलींग जमीन विक्री परवानगी

करीता

आवश्यक कागदपत्रे

अ.क्र कागदपत्रे / दस्तऐवज
1 सिलींग जमीन विक्री करणेबाबत अर्जदाराचा अर्ज रूपये 10/- कोर्ट फी स्टॅम्प
2 सिलींग जमीन कोणत्याआदेशान्वये मिळाली याबाबतचे कागदपत्र
3 जमीन विक्री बाबत कारण
4 7/12, नमुना 8 अ व नकाशा
5 सन 1954-55 ची अधिकार अभिलेख पंजी
6 रिनंबरिंग पर्ची
7 फेरफार पंजी
8 जमीनीची विक्री झालेली असल्यास सर्व विक्रीचे आदेश
9 जाहिरनामा (प्रसिध्दी प्रतिवेदनासह)
10 प्रकरणांत संबंधित तलाठी  यांचा अहवाल
11 जमीन भूसंपादन, महानगरपालिका/नगर पालिका विकास आराखडयात, लाभ क्षेत्रात,बूडीत क्षेत्रात सार्वजनिक कामासाठी,किंवा इतर कोणत्या प्रकल्पात जाते का?

याबाबत अहवाल

12 जमीन विक्रेता भुमीहीन होत आहे किंवा कसे याबाबत पुरावा
13 जमीन विक्रीदाराचे बयाण(सक्षम अधिका-यांच्या सही,शिक्क्यासह)
14 जमीन खरेदीदाराचे बयाण (सक्षम अधिका-यांच्या सही, शिक्क्यासह)
15 जमीन विक्रीदाराच्या वारसांचे शपथपत्र (नाहरकत)
16 जमीन विक्रीदाराच्या जातीचा पुरावा
17 जमीन खरेदीदाराच्या जातीचा पुरावा
18 विक्रीदार व खरेदीदार यांच्यात झालेला करारनामा(विक्री करारनामा)
19 सह दुय्यम निबंधक यांचे सिलींग जमीनीचे चालु आर्थिक वर्षाचे मुल्यांकन अहवाल
20 शासनाच्या नियमानुसार सिलींग जमीनीची अनर्जित रक्कम भरण्यास तयार असल्याबाबत व शासनाचे अटि व शर्ती मान्य असल्याबाबत प्रतिज्ञापत्र/शपथपत्र.
21 तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचा मौका चौकशी अहवाल
22 खरेदीदाराचे जमीन खरेदीचे प्रयोजन कृषक असल्यास खरेदीदार शेतकरी असल्याचा पुरावा म्हणुन 7/12 सादर करावा.
23 जर खरेदीदार व्यक्ती असेल आणि औद्योगिक प्रयोजनाकरीता जमीन खरेदी करीत असेल तर शेतजमीन खरेदीची परवानगी आवश्यक नाही. (विदर्भ कुळवहिवाट अधिनियम, 1958 चे कलम 89 अ)
24 खरेदीदार  कंपनी किंवा शेतकरी नसलेला व्यक्ती असल्यास शेतजमीन खरेदीची  परवानगी आवश्यक आहे. (विदर्भ कुळवहिवाट अधिनियम, 1958 चे कलम 89)
25 सिलींग जमीन ही पेसा कायद्याअंतर्गत येते का याबाबत अहवाल
26 उपविभागीय अधिकारी यांच्या स्वंयस्पष्ट अभिप्रायासह 22 मुद्दयांचा अहवाल
27 सिलींग जमीनीस वनसंवर्धन कायदा 1980 चे तरतुदी लागु आहे किंवा कसे याबाबत वनविभागाचा अभिप्राय.
28 प्रकरणांत औद्योगिक प्रयोजन असल्यास नगर रचना आणि मुल्य निर्धारण विभागाचा अभिप्राय
4 अर्ज कोठे सादर करावा. Ø उक्तनुसार प्रकरणात कागदपत्रे दाखल करण्याकरीता तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह अर्ज सादर करावा.
5 सिलींग जमीन कृषक/औद्योगिक प्रयोजनार्थ विक्री करण्याकरीता

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Ø  अर्जदार यांचे अर्ज प्राप्त झालेनंतर तहसीलदार यांचे स्तरावरून प्रकरण सुरू करण्यांत येऊन तलाठी अहवाल आवश्यक कागदपत्रासह मागविण्यात येईल. सदर प्रकरणांत जाहिरनामा काढून आक्षेप/हरकती घेऊन प्रकरण/प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत अपर जिल्हाधिका-यांचे मंजुरीकरीता प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांचे लॉगीन मध्ये येईल.

Ø  अर्जदार यांचे अर्जाचे अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत प्राप्त प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्राची महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांचेकडून पडताळणी करण्यात येऊन प्राथमिक तपासणीमध्ये योग्य आढळून आल्यास या कार्यालयाचे ई-ऑफिस प्रणालीमध्ये सदर प्रकरण पंजीबध्द करून मा.अपर जिल्हाधिकारी यांचेकडे मंजुरीकरीता प्रकरण/प्रस्ताव सादर करण्यात येईल.

Ø  भुसूधार कार्यासनावर सिलींग जमीन विक्री परवानगीकरीता खालील Work Flow प्रमाणे काम सुरु असेल,

कागदपत्रे पडताळणी Documents Verification महसूल सहायक / सहा. महसूल अधिकारी सहायक अधिक्षक (जमीन) उप-जिल्हाधिकारी,

(जमीन)

मा.अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर
 6 प्रकरणांत कोणत्या विभागाचे अहवाल/ अभिप्राय आवश्यक Ø  तहसीलदार यांनी प्रकरण पंजीबध्द करून जाहिरनामा काढणे व इतर विभागांचे अहवाल/अभिप्राय कृषक व औद्योगिक प्रयोजनाकरीता खालील संबंधित विभागाचे अभिप्राय/अहवाल मागविण्यात  येईल.

अ.क्र. विभागाचे/कार्यालयाचे नांव
1 संबंधित उपविभागीय कार्यालय
2 संबंधित तहसिल कार्यालय
3 दुय्यम निबंधक कार्यालय
4 संबंधित तलाठी कार्यालय
5 विक्री ज्या प्रयोजनाकरीता आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाचे अभिप्राय
 7

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आवश्यक शुल्क

 

 

 

 

 

शुल्क भरण्याची पध्दत

 

*जमिनीचे आराजी व वापरानुसार निश्चित होणारे शुल्क*

महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1961 चे कलम 29 आणि महाराष्ट्र शेतजमीन 1962 चे सुधारीत नियम 1975 व त्यापुढील सुधारणा नियम 2001(महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 19/10/2001) मधील तरतूदीनुसार

1. कृषक प्रयोजनार्थ:- दुय्यम निबंधक यांचे शिघ्रसिध्दगणकानुसार येणारे मुल्याच्या/ रक्कमेच्या 50 टक्के रक्कम आकारणी करण्यात येईल.

2. औद्योगिक/अकृषक प्रयोजनार्थ:- दुय्यम निबंधक यांचे शिघ्रसिध्द गणकानुसार येणारे मुल्याच्या/ रक्कमेच्या 75 टक्के रक्कम आकारणी करण्यात येईल.

      मा. अपर जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर निश्चित शुल्क/रक्कम भरण्याकरीता संबंधित अभियंता यांचे लॉगीनमध्ये Government Receipt Accounting System (GRAS) द्वारे MTR Form Number -6 मध्ये चलान जनरेट होईल, सदर चलान नुसार विकास शुल्क अर्जदार हे ऑनलाईन किंवा चलान कॉपीसह संबंधित बँकमध्ये थेट जमा करु शकतात.
 

8

 

अंतिम आदेश पारीत करणे

अंतिम आदेश –

प्रकरणांत अर्जदार यांनी रक्कम जमा केलेबाबत चलान डिफेस झाल्याची खात्री करून आदेश पारीत करण्यात येते.

9 संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय
अ.क्र. विषय शासन अधिसुचना दिनांक शासन निर्णय PDF
 

1

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम,1961  

19.10.2001

क्लिक करा
 

2

महाराष्ट्र शेतजमीन (सुधारणा) नियम,1975 मधील नियम 12  

 

 

क्लिक करा
10 अंतिम निर्णय घेणारे अधिकारी मा.अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर
11 निर्णय प्रक्रियेत लागणारा कालावधी 90 दिवस