बंद

आदिवासी जमीन विक्री परवानगी

 

विषय:-आदिवासी धारकाची शेतजमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनार्थ विक्री करण्याकरीता कामकाजाची आदर्श कार्यपध्दती. (Standard Operating Procedure) 

अ.क्र. तपशिल/बाब स्प्ष्टीकरण/ कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती
1 विषय आदिवासी धारकाची शेतजमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनार्थ विक्री करण्याबाबत.
2 आदिवासी धारकाची जमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनाकरीताविक्री परवानगी प्रदान करण्याबाबत अधिकार क्षेत्र      चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी धारकाची शेतजमीन अकृषक प्रयोजनार्थ विक्री परवानगी प्रदान करण्याबाबत मा. शासन, महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई यांना अधिकार प्रदान केलेले आहे.

अ.क्र अधिकाऱ्यांचे पदनाम अधिकार प्रदान करण्यात आलेले कार्यक्षेत्र परवानगी देणे कामी निश्चित मर्यादा
1 मा. शासन, महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई संपूर्ण चंद्रपूर जिल्हा आदिवासी धारकाची शेतजमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनाकरीता  परवानगी प्रदान करण्यासाठी “राज्य शासन” हे “सक्षम प्राधिकारी” असतील.
 

आदिवासी धारकाची शेतजमीन विक्री परवानगीकरीता मुळ प्रकरण /प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांचेमार्फत उपविभागीय अधिकारी यांनी प्रस्ताव/अहवाल जिल्हाधिकारी  कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.

3 आदिवासी धारकाची जमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनाकरीताविक्री परवानगी

करीता

आवश्यक कागदपत्रे

अ.क्र कागदपत्रे / दस्तऐवज
1 आदिवासी धारकाची  जमीन विक्री करणेबाबत अर्जदाराचा अर्ज रूपये 10/- कोर्ट फी स्टॅम्प
2 जमीन विक्री बाबत कारण
3 जमीन अकृषक असेल तर अकृषक परवानगी आदेश
4 7/12, नमुना 8 अ,नकाशा
5 सन 1954-55 ची अधिकार अभिलेख पंजी
6 रिनंबरिंग पर्ची
7 फेरफार पंजी
8 जाहिरनामा (प्रसिध्दी प्रतिवेदनासह)
9 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (जनजातीच्या व्यक्तींना जनजातीतर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 च्या नियम 3 अन्वये जाहीर नोटीस काढणे व प्रसिध्दी प्रतिवेदन
10 प्रकरणांत संबंधित तलाठी  यांचा अहवाल
11 जमीन भूसंपादन, महानगरपालिका/नगर पालिका विकास आराखडयात, लाभ क्षेत्रात,बूडीत क्षेत्रात सार्वजनिक कामासाठी,किंवा इतर कोणत्या प्रकल्पात जाते का?

याबाबत अहवाल

12 जमीन विक्रेता भुमीहीन होत आहे किंवा कसे याबाबत पुरावा
13 जमीन विक्रीदाराचे बयाण(सक्षम अधिका-यांच्या सही,शिक्क्यासह)
14 जमीन खरेदीदाराचे बयाण (सक्षम अधिका-यांच्या सही, शिक्क्यासह)
15 जमीन विक्रीदाराच्या वारसांचे शपथपत्र (नाहरकत)
16 जमीन विक्रीदाराच्या जातीचा पुरावा
17 जमीन खरेदीदाराच्या जातीचा पुरावा
18 विक्रीदार व खरेदीदार यांच्यात झालेला करारनामा(विक्री करारनामा)
19 सह दुय्यम निबंधक यांचे संभाव्य अकृषक/कृषक जमीनीचे चालु आर्थिक वर्षाचे मुल्यांकन अहवाल
20 तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांचा मौका चौकशी अहवाल
21 प्रकरणांत जमीन अकृषक असल्यास विक्री नंतर कोणत्या प्रकल्पासाठी जमीनीचा वापर होणार आहे? याबाबत दस्तऐवज
22 जमीन कृषक असल्यास  अकृषक प्रयोजनासाठी खरेदी करावयाची असल्यास नेमक्या कोणत्या प्रयोजनासाठी(प्रकल्पासाठी) उपयोगात येणार आहे त्याबाबत खरेदीदाराचे शपथपत्र
23 जमीन कृषक असल्यास अकृषक प्रयोजना अंतर्गत कोणत्या प्रकल्पासाठी वापर होणार आहे. त्याबाबत प्रकल्प अहवाल.
24 खरेदीनंतर कृषक जमीनीचा अकृषक वापर किती कालावधीत करणार आहे याबाबत खरेददाराचे शपथपत्र
25 जमीन कृषक असल्यास प्रश्नाधिन क्षेत्राचे कोणत्या कारणासाठी आरक्षण वर्गीकृत करण्यात आले आहे. त्याबाबतचा तपशिल
26 प्रकरणांत जमिनीचा वापर खरेदीदार गैरआदिवासी ज्या अकृषीक प्रयोजनासाठी करणार आहेत त्या वापरासंबधी नगर रचना विभागाचे अभिप्राय
27 प्रकरणांत जमीनीचे परिसरातील आदिवासी संघटनेचा अहवाल
28 जमीन ही पेसा कायद्याअंतर्गत येते का याबाबत अहवाल
29 प्रकरणांत जमीनीस वनसंवर्धन कायदा 1980 चे तरतुदी लागु आहे किंवा कसे याबाबत वनविभागाचा अभिप्राय.
30 प्रकरणांत मागील 5 वर्षातील खरेदी विक्री तक्ता व त्यानुसार येणा-या किमंतीबाबतचे अहवाल

 

4 अर्ज कोठे सादर करावा. Ø उक्तनुसार प्रकरणात कागदपत्रे दाखल करण्याकरीता तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह अर्ज सादर करावा.
5 आदिवासी धारकाची जमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनाकरीताविक्री परवानगी

करीता

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Ø  अर्जदार यांचे अर्ज प्राप्त झालेनंतर तहसीलदार यांचे स्तरावरून प्रकरण सुरू करण्यांत येऊन तलाठी अहवाल आवश्यक कागदपत्रासह मागविण्यात येईल. सदर प्रकरणांत जाहिरनामा काढून आक्षेप/हरकती घेऊन प्रकरण/प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत शासनाचे मंजुरीकरीता प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांचे लॉगीन मध्ये येईल.

Ø  अर्जदार यांचे अर्जाचे अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत प्राप्त प्रकरण/प्रस्तावातील कागदपत्राची महसूल सहायक/सहायक महसूल अधिकारी यांचेकडून पडताळणी करण्यात येऊन प्राथमिक तपासणीमध्ये योग्य आढळून आल्यास या कार्यालयाचे ई-ऑफिस प्रणालीमध्ये सदर प्रकरण पंजीबध्द करून मा.अपर जिल्हाधिकारी महोदय यांची मान्यता घेऊन मा. विभागीय आयुक्त,नागपूर यांचेमार्फत शासनास मंजुरीकरीता प्रकरण/प्रस्ताव सादर करण्यात येईल.

Ø  भुसूधार कार्यासनावर आदिवासी धारकाची जमीन विक्री परवानगीकरीता खालील Work Flow प्रमाणे काम सुरु असेल,

 

कागदपत्रे पडताळणी Documents Verification महसूल सहायक / सहा. महसूल अधिकारी सहायक अधिक्षक (जमीन) उप-जिल्हाधिकारी,

(जमीन)

मा.अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर
 

 

 

6

प्रकरणांत कोणत्या विभागाचे अहवाल/ अभिप्राय आवश्यक Ø  तहसीलदार यांनी प्रकरण पंजीबध्द करून जाहिरनामा काढणे व इतर विभागांचे अहवाल/अभिप्राय अकृषक प्रयोजनाकरीता खालील संबंधित विभागाचे अभिप्राय/ अहवाल मागविण्यात  येईल.

अ.क्र. विभागाचे/कार्यालयाचे नांव
1 संबंधित उपविभागीय कार्यालय
2 संबंधित तहसिल कार्यालय
3 दुय्यम निबंधक कार्यालय
4 संबंधित तलाठी कार्यालय
5 विक्री ज्या प्रयोजनाकरीता आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाचे अभिप्राय
 

 

 

7

 

 

 

शासनाकडून अंतिम ज्ञापन/आदेश प्राप्त झाल्यानंतर करावयाची कार्यवाही

 

 

   

मा. शासन, महाराष्ट्र राज्य यांनी आदिवासी धारकाची जमीन गैरआदिवासी यांना अकृषक प्रयोजनाकरीता  विक्री करण्यास अटि व शर्तीच्या अधिन राहुन पुर्वमान्यता दिल्यानंतर,प्रकरणांत सदरहु अटिंची पुर्तता करून मुद्देनिहाय सविस्तर अहवाल संबंधित उपविभागीय अधिकारी यांचेकडून मागविण्यात येते.

 

 

 

 

8

 

अंतिम आदेश पारीत करणे

अंतिम आदेश –

प्रकरणांत शासनाच्या ज्ञापनानुसार व संबंधित उपविभागीय अधिकारी यांचे अहवालानुसार अंतिम आदेश  पारीत करण्यात येते.

9 संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय
अ.क्र. विषय शासन निर्णय क्रमांक व दिनांक शासन निर्णय PDF
  1 आदिवासी व्यक्तींच्या जमीनी जनजातीयेत्तर व्यक्तीकडे हस्तांतरण करण्यास उक्त अधिनियमाच्या कलम 36-अ नुसार व महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तीने जनजातीयेत्तर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 मधील तरतुदीस अधिन राहुन केवळ अकृषिक कारणास्तव जमीनी हस्तांतर करण्यासंबंधात जिलहाधिकारी यांनी परवानगी देण्यास शासनाकडून पूर्व मंजूरी दिली जाते.  

 

 

शासन परिपत्रक क्रमांक -आदिवासी-3010/प्र.क्र. 313/ल-9 दि.15 सप्टेंबर, 2010

 

 

 

 

क्लिक करा

 

 

 

2 विक्री परवानगीबाबत 44 मुद्दयाचे विवरणपत्र क्लिक करा
3 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36-अ क्लिक करा
4 महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तीने जनजातीयेत्तर व्यक्तीकडे भोगाधिकार हस्तांतरीत करणे) नियम 1975 क्लिक करा
10 अंतिम निर्णय घेणारे अधिकारी मा. शासन, महाराष्ट्र राज्य  यांचे मान्यतेनंतर अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर
11 निर्णय प्रक्रियेत लागणारा कालावधी