महिला व बाल विकास कार्यालय
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय,चंद्रपुर
पत्ता:- जुना कलेक्टर बंगाला, साईबाबा वार्ड, पानी टंक्की जवळ, आकाशवाणीचा मागे,चंद्रपुर पिन- 442401
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे नाव- दिपक व्ही .बानाईत मो.क्र.-9766348987
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,चंद्रपुर अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार खालील प्रमाणे अधिसुचित सेवा असुन चंद्रपुर जिल्हाचे नागरीकांना खालील प्रमाणे सेवा देण्यात येत आहे.
अधिसुचित सेवा क्र.307 नौकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह
चंद्रपुर सारख्या नक्षलाईट व मागासलेल्या क्षेत्रात नौकरी करणाऱ्या बाहेर गावातुन आलेल्या महिला व मुलींना धर्मनिरपेक्ष उद्देश्याने तसेच त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करुन जिल्हयात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,चंद्रपुर अंतर्गत सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालीत जिजामाता वर्कींग वुमन होस्टेल,चंदपुर सुरु आहे. जिजामाता वर्कींग वुमन होस्टेल,चंदपुर ला संद 1982-83 मध्ये होस्टेल सुरु करण्याची परवागी समाज कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वार देण्यात आली. सन 1984-87 मध्ये इमरतीचे बांधकाम पुर्ण करुन वसतीगृहात कामकाजी माहिलांना प्रवेश देण्यात येत आहे. वसतीगृहाचे मंजुर प्रवेश क्षमता 30 आहे. संस्थे मध्ये कामकाजी महिलांना प्रवेश देण्यात येतो. त्या प्रमाणे संगणक प्रशिक्षण, नर्सिंग प्रशिक्षण, शिवण शाळा प्रशिक्षण, मॉन्टेसरी प्रशिक्षण करणाऱ्या महिलांना सुध्दा प्रवेश देण्यात येते.
संस्थेने आता पर्यंत 750 पेक्षा जास्त नौकरी करणाऱ्या महिलांना व प्रशिक्षणार्थीना लाभ दिला आहे.अश्या प्रकारे मागील 38 वर्षा पासुन सुरु आहे.
उपलब्ध सुविधा:-
- शहरच्या मध्यभागी सुसज्ज इमारत
- 24 तास पाणी व विज उपलब्ध
- स्वयंपाक घर व भोजन कक्ष
- सुसज्ज प्रकाशित व हवेशिर खोली
- टीव्ही,सोलर वाटर हिटर
- गेस्ट रुम, मेडीकल रुम,गर्ल्स कॉमन रुम
- योगा व मेडीटेशन हॉल
- प्रत्येक खोलीत गादी, परंग,टेबल,खुर्ची, पंखा, लाईट व आलमारी
- फयर फयटिंग सिस्टम
- सीसी टिव्ही कॅमेरेची सुविधा
संपर्क :- जिजामाता वर्कींग वुमन होस्टेल, शास्त्री नगर, चंद्रपुर मोबाईल क्रमांक. 8698177262/9373488064
अधिसुचित सेवा क्र.308 बालगृह/निरीक्षणगृह येथे बालकांना दाखल करुन घेणे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 चे कलम 41 नुसार बालगृह व निरीक्षणगृह नोंदणी होतात. या कलमा खाली काळजी व संरक्षण साठी खुले निवारागृह,विषेश दत्तक संस्था तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांन करीता सुरक्षित ठिकाण नोंदणी होतात.
बालगृहात मा.बाल कल्याण समिती यांचे आदेशान्वये हरविलेले मुले,सापडलेले मुले,सोडुन दिलेले मुले, अनाथ ,परित्यागित मुले,रस्त्यावर राहणारे मुले,बाल कामगार,बाल भिक्षेकरी,धाक्यात असलेले मुले,बाल विवाह पिडीत मुले,असक्ष पालकांचे मुलांना दाखल केले जाते.दाखल असलेल्या बालकांना अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण,प्रशिक्षण, समुपदेशन व पुनर्वसन केला जाते.
निरीक्षणगृह येथे मा.बाल न्याय मंडळ यांचे आदेशान्वये चौकशी होई पर्यंत विधीसंघर्षग्रस्त बालकांना निरीक्षणगृहात दाखल केला जाते. दाखल केलेले बालकांना समुपदेशन, शिक्षण ,प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यात येते.
चंद्रपुर जिल्हयात शासकिय मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह सन 1985 पासुन सुरु आहे.
पत्ता :- डॉ.अल्लुरवार यांचे ईमारत,सी-18,शास्त्रीनगर, शास्त्रीनगर गृह निर्माण सोसाईटी जवळ, मुल रोड,चंद्रपुर. पिन-442402
चंद्रपुर जिल्हयात शासकिय मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह सुरु असुन सन 2024 पासुन सुरु आहे.
पत्ता :- जिल्हा स्टेडीयम जवळ, साईबाबा वार्ड, चंद्रपुर पिन- 442401
अधिसुचित सेवा क्र.309 शक्ती सदन महिला निवासगृह/ पिडीत महिलांचे स्वाधारगृह
केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग,नवी दिल्ली द्वारा मान्यताप्राप्त अल्पमुदती महिला निवासगृह(क्षमता 30 लाभार्थी) सन 1996 पासुन आणि स्वाधार निवासगृह (क्षमता 100 लाभार्थी) सन 2005 पासुन कार्यन्वीत होते. सदर दोन्ही योजना सन 2018-19 मध्ये स्वाधारगृह योजना विलीन करण्यात आली. सन 2022-23 मध्ये स्वाधार योजना मिशन शक्ती अंतर्गत शक्ती सदन मध्ये विलीन करण्यात आली. चंद्रपुर जिल्ह्यात सरस्वती शिक्षण महिला मंडळ,चंद्रपुर द्वारे शक्ती सदन सुरु आहे. सदर संस्थाद्वारे आज शक्ती सदर हि योजना (क्षमता 50 लाभार्थी) कार्यन्वीत आहे. या निवासगृहामध्ये संकटात सापडलेल्या, परितक्त्या,विधवा,कारावास भोगलेल्या, कुमारी माता, नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या,वेश्या व्यवसाध सोडणाऱ्या, हिंसाचारास वेळी पडलेल्या, समाजाने बहिष्कृत केलेल्या,लौगिक अत्याचार ग्रस्त,एच.आय.व्ही ए्डस ग्रस्त महिला व मुली इत्यादींना आश्रय देवुन शिक्षण,प्रशिक्षण,समुपदेशन,कुटुंबात व समाजात समायोजन इत्यादी कार्य नियोजनबध्द पध्दतीने करण्याचे काम सुरु आहे.पोलिसांना भटकत असतांना सापडलेल्या महिला व मुली,वेश्या व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर त्या व्यवसायातुन परावृत्त करण्याच्या उद्देशाने त्यांना समुपदेशन व मदत करण्याकरीता निवासगृहात मा.न्यायालयाच्या आदेशान्वये व पोलिसाच्या मध्यममाने दाखल करण्यात येते.
प्रवेश प्रक्रिया
निवासगृह कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अन्वये आश्रय गृह सेवा देणारी संस्था जाहिर केल्यामुळे व मा.न्यायानयाच्या आदेशान्वये, जिल्हा वैद्यकिय महाविद्यालय, पोलिस विभाग,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्याल, रेल्वे पोलिस, रेल्वे चाईल्ड लाईन, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, समाजिक संस्था, संरक्षण अधिकारी तसेच समाजिक कार्यकर्ते व इतर शासकीय व अशासकीय विभाग यांच्याद्वारे किंवा समस्याग्रस्त महिला स्वत: निवासगृहात प्रवेश धेवु शकते. 24 तास विासगृह प्रवेशितांकरीता कार्यरत असते. निवासगृहात प्रवेशितांना समस्येनुसार समुपदेशन,आरोग्य तपासणी, व्यवसायीक प्रशिक्षण व कुटुंबात समायोजनाकरीता कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन तसेच वेळ प्रसंगी वैद्यकिय सुविधा,विधी सेवा व पोलिस मदत देण्यात येत असेते.
नवासगृहतील पिडीत लाभार्थींना मा.सचिव, जिल्हाविधीसेवा प्राधिकरण,चंद्रपुर यांचे मार्गर्शनानुसार न्यायालयात खटला दाखल करण्या संदर्भात मोफत विधी सेवा उपलब्ध करुन देण्यात येते.
प्रवेश,पुनर्वसन व उपस्थिती :-
सन 1996 पासुन आज पर्यंत एकुण प्रवेशीत 3000चे वर लाभार्थींना प्रवेश घेतला असुन अंदाचे 2000 चे वर लाभार्थीचे पुरर्वसन करण्यात आले आहे. आज पर्यंत पोलिसां मार्फत 1600 च्यावर महिलांना निवासगृहात आश्रय देण्यात आलेला असुन या पैकी 100च्या वर अनैतिक व्यापारअंतर्गत आलेल्या लाभार्थी आहेत.
प्रशिक्षण
संस्थेत दाखल महिलांना शिवणकाम,टंकलेखन,संगणक,ब्युटी पार्लर, हस्तकला, अंबर चरखा इत्यादी प्रशिक्षण निवासी लाभार्थींना देण्यात येत असते. आज पर्यंत एकुण 1800 चे वर प्रशिक्षण देण्यात असले असुन 500 चे वर निवासी लाभार्थींना खाजगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
विवाह
सन 1996 पासुन आजपर्यंत कुमारी माता, प्रेमप्रकरण समस्या व विधवा लाभार्थींचे पुनर्वसनाच्या माध्यमाने 119 विवाह करुन देण्यात आलेले आहेत.
पत्ता:- स्वाधार महिला निवासगृहए कृष्णानगर चौक, मुल रोड,चंद्रपुर मोबाईल क्रमांक-9765932527