बंद

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी – महाराष्ट्र योजना

तारीख : 24/04/2025 - 31/12/2025 |

        योजनेची संक्षिप्त माहिती:-

1. उददेश :-  ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना रोजगार पुरविणे

ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी सिंचन सुविधा व भौतीक मत्ता निर्माण करणे.

2. निकष :- अ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अकुशल रोजगार मिळण्यास्तव निकष

  1.  ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
  2.  वयाची 18 वर्ष पुर्ण झालेली असावी.
  3.  योजने अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक.
  4. कामाची मागणी करणे आवश्यक.

ब) वैयक्तीक स्वरुपाच्या कामाचा लाभ घेण्यासाठीचे निकष

:- महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 ( दिनांक 6 ऑगस्ट 2014 पर्यत सुधारित) मधील अधिसुचना दोन मधील परिच्छेद – 4 मध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे लाभाची कामे देतांना खालील प्रवर्गातील कुटूंबाना प्राध्यान्य देण्यात येतील. – अनुसुचित जाती – अनुसुचित जमाती – भटक्या जमाती – निरधिसुचित जमाती (विमुक्त जाती) – दारिद्रयरेषेखालील इतर कुटूंबे – स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे – शारिरीकदृष्टया विकलांग कर्ता असलेली कुटूंबे – जमीन सुधारणाचे लाभार्थी – इंदिरा आवास योजने खालील लाभार्थी – अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी (वन हक्क मान्य करणे)

क. आवश्यक कागदपत्रे :-

  •  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अकुशल रोजगार मिळण्यास्तव आवश्यक कागदपत्रे
  •  आधार कार्ड क्रमांक • बॅक/पोस्ट खाते क्रमांक /पासबुकची प्रत
  •  वैयक्तीक स्वरुपाच्या कामाचा लाभ घेण्यासाठीचा कामांच्या प्रकारानुसार आवश्यक कागदपत्रे
  •  जमीनीचा सात बारा • जमीनीचा नमूना आठ • जमीनीचा नकाशा • शेतजमीन सामुहिक असल्यास संमती

लाभार्थी:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी

फायदे:

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी

अर्ज कसा करावा

योजनेसाठी संपर्क कोणाकडे करावा लागेल :- 1. ग्राम पंचायत :- सचिव,/ ग्राम रोजगार सेवक 2. पंचायत समिती :- गट विकास अधिकारी